From Poverty to Riches... Shibu Soren's Luck Shines with 'Lucky Jeep'
Shibu Soren Lucky Jeep Story: झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची आज (४ ऑगस्ट) निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. झारखंडच्या राजकीय इतिहासात शीबू सोरेन यांचे मोलाचे योगदान मानले जाते. पण दुमकाच्या खिजुरिया येथील त्यांच्या निवासस्थानी आजही एक जीप उभी आहे. ही सामान्य जीप नाही, तर राजकारणाच्या जगात झामुमो’ला गरिबीतून श्रीमंतीकडे घेऊन जाणारी ‘भाग्यवान जीप’ आहे. झामुमोचे लोक तिला लक्ष्मीनिया जीप मानतात. म्हणून आजही गुरुजींच्या निवासस्थानी ही जीप अतिशय काळजीपूर्वक ठेवण्यात आली आहे. १९८० च्या दशकात पहिल्यांदा दुमका येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ट्रेनने दिल्लीला जाण्यासाठी निघाले ते याच जीपमधून.
त्यावेळी शिबू सोरेन यांच्यासोबत या जीपमध्ये बसलेल्या नेत्यांनी त्या दिवसांच्या आठवणी आजही त्यांच्या हृदयात जपल्या आहेत. दुमकाच्या टिन बाजारात राहणारे झामुमोचे समर्पित आणि निष्ठावंत कार्यकर्ते अनुप कुमार सिन्हा जुन्या काळाची आठवण करून देताना म्हणाले की, ‘ दुमकाने शिबू सोरेन यांना केवळ राजकीय ओळख दिली नाही तर त्यांना गरिबीतून श्रीमंतीकडेही नेले. गुरुजींनी या प्रदेशात झामुमोचे राजकारण सुरू केले तेव्हा संथाल परगणामध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते.’
जल, जंगल आणि जमिनीचे प्रश्न उपस्थित करून, वेगळ्या झारखंड राज्याचे नेते शिबू सोरेन, सावकारी व्यवस्थेविरुद्धच्या चळवळीला चालना देऊन आदिवासींचे दिशाम गुरु बनले. हा काळ १९७० चा होता. १९७०-८० चा दशक शिबू सोरेन यांच्यासाठी संघर्ष आणि चळवळीचा काळ होता, परंतु जेव्हा त्यांनी संथाल परगण्याच्या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा त्यांना येथील जमीन आवडली. दुमकाने त्यांना राजकीय मान्यता दिली.
शिबू सोरेन यांनी १९८० मध्ये पहिल्यांदा दुमका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आणि दिल्ली गाठली. त्यानंतर शिबू सोरेन यांनी मागे वळून पाहिले नाही. गुरुजी म्हणून ओळखले जाणारे सोरेन झारखंडच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी लढणाऱ्या चळवळीचे प्रमुख नेतृत्व होते. त्यांच्या संघर्षातून १९९५ मध्ये बिहार सरकारने झारखंडच्या स्थापनेसाठी ‘झारखंड क्षेत्रीय परिषदे’ची (JAC) स्थापना केली. हा निर्णय झारखंड राज्याच्या निर्मितीकडे टाकलेले पहिले ठोस पाऊल मानले जाते.
Eknath Shinde : बेळगावमधील अनेक मठाधिपतींचा शिवसेनेत प्रवेश, कर्नाटकात शिवसेना पक्ष वाढीला मिळणार
अनुप सोरेन सांगतात की, ‘१९८० मध्ये शिबू सोरेन पहिल्यांदाच दुमका येथून खासदार म्हणून निवडून आले होते. त्याआधी दिवंगत सायमन मरांडी लिट्टीपारा विधानसभा मतदारसंघातून मासे या निवडणूक चिन्हावर आमदार झाले होते. त्यावेळी गुरुजींचे निवडणूक व्यवस्थापन काही कार्यकर्त्यांकडे होते, ज्यात प्रो. स्टीफन मरांडी, विजय कुमार सिंह आणि इतर अनेक प्रमुख चेहरे होते. तेव्हा अविभाजित बिहारचा काळ होता आणि झामुमोचे प्रमुख शिबू सोरेन यांचे राजकारण बिहारपासून केंद्रापर्यंत पसरले होते.
अनुप सोरेन यांनी सांगितले की, ‘झारखंड राज्यासाठीच्या ऐतिहासिक चळवळीची रणनीती दुमकाच्या टिन बाजारातील शिबू सोरेन यांच्या टाइलच्या छोट्या घरात आखली जायची. गुरुजी (शिबू सोरेन) जेव्हा जेव्हा दुमकाला परत यायचे, तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून झारखंडच्या लढ्याची दिशा ठरवत असे. त्या काळात संथाल परगणा भागात संसाधनांची मोठी टंचाई होती. रस्ते कच्चे होते. संपूर्ण परिसर जंगलांनी आणि डोंगरांनी वेढलेला होता. अशा परिस्थितीतही गुरुजी जुन्या जीपमधून गावागावांत पोहोचायचे. त्यांची रात्र कुठे जाईल याची खात्री नसे. डिझेल संपू नये म्हणून ते आधीच प्लास्टिकच्या डब्यांमध्ये डिझेल सोबत ठेवायचे, तर कधी कधी जीप ढकलूनही सुरू करावी लागायची. आजकाल हे सर्व बदलले आहे. गुरुजींच्या वारशाचे प्रतिनिधित्व त्यांचे पुत्र हेमंत सोरेन आणि बसंत सोरेन करत आहेत. एकेकाळी संघर्षाचे केंद्र असलेले दुमका आज सत्तेचा केंद्रबिंदू बनले आहे. झारखंड राज्य स्थापन झाले असून झारखंड मुक्ती मोर्चा सत्तेच्या शिखरावर पोहोचले आहे.
Shibu Soren passes away: मोठी बातमी! झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
१९८० मध्ये शिबू सोरेन यांनी दुमका लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत संसदीय राजकारणात प्रवेश केला. मात्र १९८४ मध्ये काँग्रेसचे पृथ्वीचंद किस्कू यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जामा मतदारसंघातून विजय मिळवला आणि पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पाऊल ठेवले. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने झारखंडमधील १४ पैकी ६ जागांवर विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यामध्ये दुमका (शिबू सोरेन), राजमहल (सायमन मरांडी) आणि गोड्डा (सूरज मंडल) या प्रमुख जागा होत्या. हे तिघे ‘ट्रिपल एस’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९९६ मध्ये मात्र झामुमोला अपयश आले. शिबू सोरेन वगळता सर्व उमेदवार पराभूत झाले. तरीही, एकदा आमदार आणि आठ वेळा खासदार होण्याचा विक्रम गाठणाऱ्या शिबू सोरेन यांच्या चमत्कारीक नेतृत्वामुळेच झारखंडचा लढा आज यशस्वी झाला आहे, असे अनुप यांनी यावेळी नमुद केले.