Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Accident : कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

महाकुंभमध्ये स्नान करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १० भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 31, 2025 | 09:10 PM
Sangli News : बलवडी फाट्याजवळ भीषण अपघात; कारच्या धडकेत महिला पोलिसाचा मृत्यू

Sangli News : बलवडी फाट्याजवळ भीषण अपघात; कारच्या धडकेत महिला पोलिसाचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

प्रयागराजमधील महाकुंभात स्नान करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १० भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नंदगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुसुम्ही महामार्गावर ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

महाकुंभाहून पिकअप व्हॅनने भाविक गाजीपूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी वाराणसी-गोरखपूर महामार्गावर पिकअपवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी जोराची होती की ट्रकला धडकल्यानंतर पिकअपमधील लोक रस्त्यावर पडले. याच दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

भीषण अपघातानंतर स्थानिकांनी सूचना पोलिसांना दिली. अपघाताची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरील मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. या अपघातामधील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये २ महिला, २ पुरुष आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचत माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी जखमींची विचारपूस केली.

रस्ता अपघातात जखमी झालेल्या जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर उपचार करण्यात येत आहे. एसपी डॉ. ईरज राजा यांनी सांगितलं की, ‘भीषण अपघातात ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाजीपूरमधील रस्ता अपघाताची दखल घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली. मुख्यमंत्री योगी यांनी जखमींवर रुग्णालयात तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले. तसेच यावेळी योगी आदित्यनाथ यांनी जखमी लोक लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना केली.

Web Title: Ghazipur car accident 6 devotees died during returning from mahakumbh 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 09:10 PM

Topics:  

  • Kumbh Mela
  • Mahakumbh 2025
  • Mahakumbh Mela
  • up accident news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ‘रामकाल पथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
1

Devendra Fadnavis: ‘रामकाल पथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

Devendra Fadnavis यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी 5,500 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन; म्हणाले…
2

Devendra Fadnavis यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी 5,500 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन; म्हणाले…

Kumbh Mela 2027: जळगावला विमानसेवा, पण ‘पर्यटन राजधानी’ छत्रपती संभाजीनगर अजूनही दुर्लक्षित!
3

Kumbh Mela 2027: जळगावला विमानसेवा, पण ‘पर्यटन राजधानी’ छत्रपती संभाजीनगर अजूनही दुर्लक्षित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.