हायकोर्टात 'हायव्होल्टेज हंगामा'; थेट न्यायाधीशासमोरच BEER प्यायला वकील, न्यायाधीशाने थेट....
अहमदाबाद: काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने गुजरात हायकोर्टमधील सुनावणी टॉयलेटमध्ये बसून ऐकली होती. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान आता त्याच गुजरात हायकोर्टमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरात हायकोर्टमध्ये सुनावणी सुरू असताना एक विचित्र घटना घडली आहे. सुनावणी दरम्यान एक वकील कोर्टरूममध्ये बियर पिताना आढळून आले. त्यामुळे न्यायाधीश चांगलेच भडकले आहेत.
सुनावणी सुरू असताना वरिष्ठ वकील बियर पिताना दिसून आले. त्यामुळे न्यायाधीश चांगलेच संतापले. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. हे प्रकरण 26 जूनचे असल्याचे समोर आले आहे. गुजरात हायकोर्टमध्ये जस्टीस संदीप भट्ट हे एका प्रकरणाची व्हर्च्युअल सुनावणी घेत होते. तेव्हा एक वरिष्ठ वकिल न्यायाधीश यांच्यासमोर हजर झाले. तेव्हा त्यांच्या हातात एक कप होता त्यातून ते बियर पित होते.
गुजरात हायकोर्ट काय म्हणाले?
गुजरात हायकोर्टाचे न्यायाधीश ए. एस. सुपाहिया आणि आर. टी. वछवानी यांनी वकिलाच्या या कृत्याला चुकीचे ठरवले आहे. त्यांनी असे कृत्य कोर्टाचा अवमान असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या प्रकरणात स्वता: कारवाई केली आहे. तसेच वकिलांना पुढील आदेश येईपर्यंत हरज राहण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.
गुजरात हायकोर्टने रजिस्ट्रारला वकिलावर अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वकील त्या प्रकरणाच्या सुनावणीस हजर राहू शकणार नाहीत. तसेच हायकोर्टाने वकिलाच्या पदवीचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देखील दिल आहे.
ऑनलाईन सुरु होती हायकोर्टची सुनावणी, व्यक्तीने टॉयलेटमध्ये हलकं होत ऑन केला कॅमेरा
नेचर कॉल ही एक अशी गोष्ट आहे जी आपण कितीही ठरवलं तरी रोखू शकत नाही. त्यातच आता यासंबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे ज्यात व्यक्ती हाय कोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीदरम्यान आपल्या टॉयलेटमध्ये निसर्गाच्या हाकेला उत्तर देताना दिसून आला. व्यक्तीने टॉयलेट सीटवर हलकं होत समोर मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि हिअरिंग अटेंड केली. सुनावणीदरम्यान ती व्यक्ती शौचालयात बसून शौच करत होती आणि हे दृश्य संपूर्ण न्यायालयासमोरील स्क्रीनवर दिसत होते, ज्याची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑनलाईन सुरु होती हाय कोर्टची सुनावणी, व्यक्तीने टॉयलेटमध्ये हलकं होत ऑन केला कॅमेरा; Video Viral
ही घटना २० जून २०२५ रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान घडून आली. व्हिडिओमध्ये ‘समद बॅटरी’ नावाचा स्क्रीन नेम असलेला एक व्यक्ती त्याच्या मोबाईलद्वारे न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणीत सामील झाल्याचे दिसून येते. मात्र कोणत्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये बसून तो सुनावणीला सामील झाला नाही तर शौचालयात टॉयलेट सीटवर बसत तो सुनावणीला हजर झाला. यावेळी त्याने कानात ब्लूटूथ इयरफोन घातल्याचेही दिसून आले.