फोटो सौजन्य: X)
नेचर कॉल ही एक अशी गोष्ट आहे जी आपण कितीही ठरवलं तरी रोखू शकत नाही. त्यातच आता यासंबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे ज्यात व्यक्ती हाय कोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीदरम्यान आपल्या टॉयलेटमध्ये निसर्गाच्या हाकेला उत्तर देताना दिसून आला. व्यक्तीने टॉयलेट सीटवर हलकं होत समोर मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि हिअरिंग अटेंड केली. सुनावणीदरम्यान ती व्यक्ती शौचालयात बसून शौच करत होती आणि हे दृश्य संपूर्ण न्यायालयासमोरील स्क्रीनवर दिसत होते, ज्याची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केरळच्या पुरात गजराजाचे हाल झाले बेहाल; तब्बल ३ तास लाटांना झुंज दिली पण शेवटी जे घडलं…. Video Viral
ही घटना २० जून २०२५ रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान घडून आली. व्हिडिओमध्ये ‘समद बॅटरी’ नावाचा स्क्रीन नेम असलेला एक व्यक्ती त्याच्या मोबाईलद्वारे न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणीत सामील झाल्याचे दिसून येते. मात्र कोणत्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये बसून तो सुनावणीला सामील झाला नाही तर शौचालयात टॉयलेट सीटवर बसत तो सुनावणीला हजर झाला. यावेळी त्याने कानात ब्लूटूथ इयरफोन घातल्याचेही दिसून आले.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात व्यक्ती टॉयलेटमध्ये जात आपला कॅमेरा टॉयलेट सीटच्या समोर ऍडजस्ट करताना दिसून येतो. यांनतर हलकं होत होत या सुनावणीला लक्षपूर्वक ऐकू लागतो. हलकं झाल्यानंतर तो शौचालयातून बाहेर जातानाही दिसून येतो. न्यायालयीन नोंदींनुसार, हा माणूस एका फौजदारी खटल्यात तक्रारदार होता आणि एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात हजर झाला होता. दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्यपूर्ण तोडगा निघाल्यानंतर न्यायालयाने एफआयआर रद्द केला. पण या संपूर्ण नाटकात न्यायालयाचा निर्णय काहीच नाही, तर खरी चर्चा या ‘वॉशरूम सुनावणी’बद्दल झाली. व्हिडिओ व्हायरल होताच, कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या प्रतिक्रियांचा पूर आला. जिथे लोकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आणि बहुतेक मजेदार आणि टीकात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
A video showing a man attending Gujarat High Court virtual proceedings while seated on a toilet and apparently relieving himself has gone viral on the social media.
Read full story: https://t.co/FbendKMD2M #GujaratHighCourt #VirtualHearings #VideoConferencehearing… pic.twitter.com/spyxMiptiO
— Bar and Bench (@barandbench) June 27, 2025
पांचट Jokes: मुलगा… आई, गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते? उत्तर ऐकाल हसून हसून वेडे व्हाल
घटनेचा व्हिडिओ @barandbench नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “फक्त वकिलांनाच VC करण्याची परवानगी दिली पाहिजे. जर एखाद्या क्लायंटला त्याच्यासोबत सामील व्हायचे असेल तर त्याने वकिलाच्या चेंबरमधून सामील व्हावे. अशा घटना जागतिक पातळीवर लाजिरवाण्या ठरतात. कल्पना करा किती धाडस आहे. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता समजलं मला लोक जस्टीसच्या वेळी हगतात का”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.