Gujarat Accident: गुजरातच्या 'या' धार्मिकस्थळी मोठी दुर्घटना; रोप-वे तुटल्याने 6 जण दगावले तर...
गुजरातमध्ये रोपवे तुटून 6 जणांचा मृत्यू
पावागड शक्तीपीठ या ठिकाणी घडली घटना
अनेक लोक जखमी असण्याची शक्यता
Pavagadh Accident: गुजरातमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुजरातमध्ये रोप-वे तुटल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण जखमी देखील झाल्याचे समजते आहे. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. पंचमहल जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र असलेल्या पावागड येथे ही घटना घडली आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पावागड येथे रोप वे चे काम सुरू असल्याने सामान नेणारी ट्रॉली तुटली. त्यामुळे ही घटना घडली आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले असण्याची शक्यता आहे.
पावागड येथील या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Panchmahal, Gujarat | Six people died after a trolley carrying construction material for the ropeway in Pavagadh broke down: Panchmahal DSP Dr. Harsh Dudhaat
— ANI (@ANI) September 6, 2025
घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू
पावागड येथील या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत . या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील प्रशासनाने दिली आहे. मृतांचे देह पोस्टमोर्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
लाल किल्ल्यात जबरी चोरी
दिल्ली येथील लाला किल्ला परिसरात मंगळवारी एक जबरी चोरी झाल्याचे समोर आले आहे. एक कोटी रुपयांचा कलश चोरी झाल्याचे समोर आले आहे. लाल किल्ला परिसरात जैन समाजाचे एक धार्मिक अनुष्ठान सुरु होते. सगळे जण धार्मिक कार्यक्रमात व्यग्र असतानाच चोरांनी ७६० ग्राम सोने, १५० ग्राम हिरे, माणिक मोती, पन्ना यांनी मढवलेल्या कलशावर हात साफ केला. त्यांनी अशी हात सफाई केली की चोरीनंतर बराच वेळ अनेकांची ही घटना लक्षात सुद्धा आली नाही. काही वेळा नंतर कलश न दिसल्याने खळबळ उडाली. तर येथील सुरक्षा व्यवस्थेवरून आता प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली आहे.
Delhi: लाल किल्ल्यात जबरी चोरी, चोरट्यांनी मारला 1 कोटीच्या कलशावर मारला हात; जैन समाजाच्या कार्यक्रमात काय घडलं?
नेमकं काय घडलं?
दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात जैन समाजाचे धार्मिक अनुष्ठान सुरू होते. या कार्यक्रमासाठी विविध रत्नआभुषणांनी, सोन्याने मढवलेला कलश ठेवण्यात आला होता. त्याची बाजारातील किंमत एक कोटींच्या घरात होती. सर्वच जण धार्मिक कार्यक्रमात व्यग्र होते. काहींची पूजेची लगबग सुरू होती. त्यावेळी चोरट्यांनी संधी साधली. त्यांनी हा कलश चोरला. हा कलश 760 ग्रॅम सोने, हिरे, माणिक मोती आणि पन्ना यांनी मढवलेला होता. पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती देण्यात आली.