Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

मोहप्याच्या बाहेर गिट्टीच्या ट्रक (क्र. एमएच ४० बीजी ७७५०) च्या चालकाने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू तर गंभीर जखमी तनवीने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2026 | 12:20 PM
नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : बारावीची परीक्षा देण्यासाठी वडिलांसोबत निघालेल्या लेकीचे स्वप्न काही किलोमीटरवरच चिरडले. गिट्टीने भरलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू तर मैत्रीण गंभीर जखमी झाली. उमरेड-मोहपा मार्गावर गुरुवारी सकाळी १० वाजता घडलेल्या अपघाताने परिसर हळहळला आहे.

सुभाष केशव भिवणकर (वय ५०, रा. मोहपा), मुलगी तनवी (वय १६) या दोघांचा मृत्यू झाला. वंशिका ज्ञानेश्वर नरुळे (वय १७) ही विद्यार्थिनी गंभीर जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तनवी व वंशिका यांची बारावीची परीक्षा असल्याने सुभाष भिवणकर सकाळी १० वाजता त्यांना घेऊन दुचाकीवरून उमरेडकडे निघाले होते. मोहप्याच्या बाहेर गिट्टीच्या ट्रक (क्र. एमएच ४० बीजी ७७५०) च्या चालकाने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू तर गंभीर जखमी तनवीने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

हेदेखील वाचा : Karnatak Crime: सासरच्यांच्या वेश्या व्यवसायाच्या दबावाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; कर्नाटकातील घटना

दरम्यान, अपघातानंतर ग्रामस्थांनी टिप्पर चालकाला चांगला चोप दिला व टिप्परला आग लावली. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

गावातील चुली पेटल्याच नाही

उमरेड ग्रामीण रुग्णालयात बाप-लेकीवर शवविच्छेदन करण्यात आले. मोहपा परिसरातील सात गिट्टी खाणींच्या मालकांनी संयुक्तरीत्या मृतांच्या कुटुंबीयांना 65 लाखांची मदत जाहीर केली आहे. या घटनेमुळे दिवसभर मोहपा गावात शोककळा पसरली. घरांत चुली पेटल्या नाही.

भरधाव जड वाहने ठरताहेत धोकादायक

गिट्टी खाणींमधून धावणारे टिप्पर आणि ट्रक या मार्गावर दिवसरात्र वेगाने धावतात. वेगमर्यादा, अडथळे, वाहतूक नियंत्रण किंवा पोलिस तपासणी नसल्याने हा रस्ता अपघातप्रवण ठरला आहे. धनाजी जळक, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांच्यासह पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाने जळत्या वाहनावर नियंत्रण मिळवले. टिप्परचालक प्रफुल्ल दशरथ भोयर (२७) याला अटक केली असून, उमरेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime: पाणी मागून घरात शिरला अन्‌…; रिक्षाचालकाने वृद्धेचा गळा आवळून चोरले दागिने, विश्वासाला तडा !

Web Title: Father and daughter died in accident incident nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण
1

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यापार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त
2

Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यापार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर
3

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

डिजीटल क्रांतीकडे एक पाऊल जातोय पुढे…; मात्र सायबर क्राईमचा धोका आजही कायम
4

डिजीटल क्रांतीकडे एक पाऊल जातोय पुढे…; मात्र सायबर क्राईमचा धोका आजही कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.