Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेत निसर्गाचा ब्रेक; हायवे बंद अन्…; पहा Video

रस्ता बंद झाल्याने एनडीआरएफ आणि एसडीआरएफने 40 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. याबाबतची काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढताना पाहायला मिळत आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 03, 2025 | 10:54 AM
Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेत निसर्गाचा ब्रेक; हायवे बंद अन्…; पहा Video
Follow Us
Close
Follow Us:

केदारनाथ: गेल्या काही दिवसांमध्ये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मंडी जिल्ह्यात तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर उत्तराखंडमध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनप्रयाग-मूनकटिया भागात भुस्खलन झाले आहे.

सोनप्रयाग-मूनकटिया भागात तब्बल 40 श्रद्धाळू अडकले आहेत. मात्र एसडीआरएफने अथक प्रयत्न करून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या परिसरात मुसळधार पावसामुळे अचानक भुस्खलन झाले. त्यामुळे तिथे 40 श्रद्धाळू अडकून पडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.

समोर आला व्हिडिओ

रस्ता बंद झाल्याने एनडीआरएफ आणि एसडीआरएफने 40 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. याबाबतची काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढताना पाहायला मिळत आहे.

यमुनोत्री हायवे बंद

यमुनोत्री येथे ढगफुटी झाल्याने हायवेवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

हिमाचलमध्ये पावसाचा रुद्रावतार

गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाण ढगफुटी झाली आहे. दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आज मंडी जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगफुटी झाली. गेल्या काही दिवसांत 5 ते 6 वेळेस मंडी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये आतापर्यंत 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Monsoon Alert: हिमाचलमध्ये पावसाचा रुद्रावतार; तब्बल 11 ठिकाणी ढगफुटी अन्…; चार दिवस अक्षरश: धुवून काढणार

मंडी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून, 34 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. आज हिमाचल प्रदेशमध्ये तब्बल 11 ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक घटना या मंडी जिल्ह्यात घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचलमधील तब्बल 282 पेक्षा जास्त मार्ग बंद करण्यात आले आहेत. चंदीगड-मनाली महामार्ग देखील बंद करण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहा:कार

संपूर्ण देश मान्सूनने व्यापला आहे. देशातील अनेक राज्यात तूफान पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पुरामुळे 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत.

#WATCH रुद्रप्रयाग, उत्तराखंड: श्री केदारनाथ धाम से लौटते समय सोनप्रयाग भूस्खलन क्षेत्र में फंसे करीब 40 श्रद्धालुओं को SDRF ने बचाया।

केदारनाथ धाम के रास्ते में सोनप्रयाग के पास देर रात अचानक मलबा गिर गया, जिसके कारण केदारनाथ धाम से लौट रहे 40 से अधिक तीर्थयात्री कल रात करीब 10… pic.twitter.com/WzMg9KyAAV

— ANI_HindiNews (@AHindinews) July 3, 2025

कांगडा जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू; ‘या’ पर्यटनस्थळी ढगफुटी

हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे परीतनवर काहीसा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. सेज घाट परिसरात ढगफुटी झाली आहे. यानंतर तेथील एका नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेथील पार्वती नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याचे समजते आहे.

 

Web Title: Heavy rain in uttrakhand kedarnath yatra stopped viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Kedarnath

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
4

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.