Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HMPV first case in India: HMPV चा भारतात शिरकाव, सापडला पहिला रूग्ण; 8 महिन्यांच्या चिमुकल्या बाळात आढळला विषाणू

जग नुकतेच कोरोना संसर्गातून सावरले असताना आता चीनमधून आलेल्या एका विषाणूने जगात खळबळ उडवून दिली आहे. बेंगळुरू येथील रुग्णालयात आठ महिन्यांच्या बाळामध्ये HMPV विषाणू आढळून आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 06, 2025 | 11:06 AM
HMPV first case in India: HMPV चा भारतात शिरकाव, सापडला पहिला रूग्ण; 8 महिन्यांच्या चिमुकल्या बाळात आढळला विषाणू
Follow Us
Close
Follow Us:

बेंगलुरू, कर्नाटक:  जगाला हादरवून सोडणाऱ्या कोविड-19 महामारीनंतर चीनमध्ये HMPV नावाच्या विषाणूने थैमान घातले  आहे. त्यातच आता भारतातही HMPV विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण समोर आला आहे. बंगळुरू येथील रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलामध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे.  एचएमपीव्ही नावाच्या व्हायरसची पहिली केस बेंगळुरूमध्ये समोर आली आहे.  बेंगलुरूमध्ये 8 महिन्याच्या मुलामध्ये ह्यूमन मेटान्यूमोवायरस (एचएमपीवी) ची पुष्टी झाली आहे.

मुलाला सातत्याने ताप होत असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नियमित रक्त तपासणी दरम्यान या विषाणूची पुष्टी झाली. कर्नाटकमधील आरोग्य विभागाने या विषाणूचे प्रकार कळवलेले नाहीत, मात्र   विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी नमुने पुणे पाठवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  या 8 महिन्याच्या मुलाचा चीनमधील प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. भारतात आढळलेला एचएमपीवी विषाणू वेगळा आहे. चीनमधील विषाणू आणि इथे आढळलेल्या विषाणूचे स्ट्रेन संबंधित आहेत का, याबाबतही अद्याप कोणतीही माहिती नाही.त्यामुळे हे नमुने पुण्यातील लॅबमध्ये पाठवले जाणार आहेत.

गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया

एचएमपीवी विषाणू काय आहे?
एचएमपीवी (ह्यूमन मेटान्यूमोवायरस) हे एक सामान्य श्वसन विषाणू आहे जो सर्व वयाच्या लोकांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. या विषाणूचा जास्त परिणाम वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांवर होऊ शकतो. विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. या विषाणूच्या काही सामान्य लक्षणांमध्ये नाक गळणे, गळ्यात खवखव, डोकेदुखी, थकवा, खोकला, ताप आणि थंडी लागणे यांचा समावेश होतो.

गेल्या अनेक दशकांपासून एचएमपीव्ही विषाणू अस्तित्वात असल्याचे सांगितले जात आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये याची प्रथम ओळख झाली. श्वसन रोग असलेल्या मुलांच्या नमुन्यांमध्ये विषाणूची पुष्टी झाली. एचएमपीव्ही हा पॅरामिक्सोव्हिरिडे कुटुंबातील विषाणू आहे. हा विषाणू सर्व ऋतूंमध्ये हवेत असतो. संक्रमित लोकांच्या खोकल्यामुळे आणि शिंकण्याने याचा प्रसार होतो. हिवाळ्यात त्याचा अधिक प्रसार होण्याचा धोका असतो. तथापि, तज्ञ म्हणतात की एचएमपीव्ही विषाणू 1958 पासून मोठ्या प्रमाणावर पसरला होता.

IND vs AUS : गंभीर आणि आगरकर घेणार काही मोठे निर्णय? भारतीय संघात होणार बदल

एचएमपीव्ही विषाणूची लक्षणे

कोरोनासारखी लक्षणे
उच्च ताप आणि खोकला
श्वसनाचा त्रास
फुफ्फुसाचा संसर्ग
अनुनासिक रक्तसंचय
घशात घरघर
संपर्काद्वारे पसरतो

भारतातील तयारी

चीनमध्ये एचएमपीवी विषाणूच्या प्रकोपाच्या बातम्यांनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाही अलर्ट मोडवर आले आहे.  केंद्र  सरकार सर्व उपलब्ध माध्यमांद्वारे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि डब्ल्यूएचओकडून वेळोवेळी माहिती मिळवण्याची विनंती केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, एचएमपीवी चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवली जाईल आणि भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) संपूर्ण वर्षभर एचएमपीवीच्या पसरलेल्या प्रमाणावर लक्ष ठेवणार आहे.

 

 

 

 

 

Web Title: Hmpv first case in india virus found in 8 month old baby nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • Bangalore
  • China
  • HMPV Virus
  • india

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.