Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आग्रा-लखनऊ हायवे मार्गावर भीषण अपघात; बसची ट्रकला धडक, 5 जण ठार, 9 जखमी

आग्रा-लखनऊ एक्सप्रेस हायवेवर एक मोठा भीषण अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला एका बसने जोरात धडक दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 09, 2024 | 11:57 AM
Accident

Accident

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: आग्रा-लखनऊ एक्सप्रेस हायवेवर एक मोठा भीषण अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला एका बसने जोरात धडक दिली आहे. या धडकीमध्ये बसमधील 5 प्रवाशांच्या मृत्यु झाला असून 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. अशी माहिती बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मद्यधुंद अवस्थेत बसचालक असल्याने नियंत्रण सुटले आणि अपघात घडला 

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मथुरेहून लखनऊला जात होती. दरम्यान फिरोजाबाद जवळ महामार्गावर उभ्या असले ट्रकला पाठीमागून येणाऱ्या बसने धडक दिली. बसमध्ये सुमारे २५ प्रवासी प्रवास करत होते. यात ८ लहान मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेतील बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बसचालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याने त्याने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे.

हे देखील वाचा- पुन्हा एकदा रेल्वे अपघात! सिकंदराबाद-शालीमार एक्सप्रेसचे डब्बे रुळावरून घसरले

जखमींना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर फिरोजाबादच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर अवस्थेतील एकाला आग्र्याच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने महामार्गावर प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालकांना अधिक सतर्कता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सार्वजनिक वाहतूक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह 

पोलिसांनी अपघाताच्या अनुषंगाने तपास सुरू केला असून चालकाच्या मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालवण्याच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप प्रवाशांचे प्राण गेले आहेत. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधी सहारनपूर जिल्ह्यात गंगोह पोलीस स्टेशन परिसरात एक मोठा रस्ता अपघात घडला होता. या अपघातात दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळल्याने प्रवाशांपैकी दोन जण जागीच मृत्युमुखी पडले, तर एकाने हेल्मेट घातल्यामुळे त्याचे प्राण वाचले.

हे देखील वाचा- Todays Gold Price: मुंबईसह देशभरातील या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ, वाचा आजचे दर

वाहतूक नियमांचे पालन गरजेचे

या दुहेरी अपघातांमुळे प्रवासी सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे पालन याबद्दल गंभीर विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल.

Web Title: Horrific road accident on agra lacknow express highway bus collides with truck nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 11:57 AM

Topics:  

  • Lakhnow
  • Road Accident

संबंधित बातम्या

समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त
1

समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त

Pune News: “रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण…”; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
2

Pune News: “रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण…”; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

हृदयद्रावक! कार ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणाने चार जणांना चिरडलं; १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू
3

हृदयद्रावक! कार ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणाने चार जणांना चिरडलं; १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री अपघात; मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकाने भरधाव गाडी…
4

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री अपघात; मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकाने भरधाव गाडी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.