पश्चिम बंगालमधील सिकंदराबाद शालीमार सुपरफास्ट ट्रेन अपघात झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
कोलकाता : देशाचे रेल्वे अपघाताचे सत्र वाढले आहे. मागील काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा रेल्वे अपघात झाला आहे. कोलकात्याच्या हावडामधील नालपूरजवळ ट्रेनचा अपघात झाला आहे. सिकंदराबादहून शालिमारकडे येणाऱ्या शालीमार गाडी अपघात झाला असून यामध्ये रेल्वेचे डबे रुळावरून घसरले. ही घटना आज (दि.09) पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली.
सिकंदराबाद-शालीमार एक्सप्रेसचा नालपूर येथे हा अपघात झाले. या अपघातामध्ये गाडीचे 3 डबे रुळावरुन घसरले. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या अपघातामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली माहिती समोर आलेली नाही. रेल्वे रुळावर घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या अपघातामध्ये एक पार्सल बोगी आणि दोन प्रवासी बोगी रुळावरून घसरली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सांस लेता हूं और एक नया #TrainAccident हो जाता है
मतलब देश में अधिकांश सामान्य लोग जिस परिवहन का प्रयोग करते हैं वह सबसे असुरक्षित है, नहीं पता कब क्या घटना हो जाये।
दरअसल खबर कोलकाता से है जहां हावड़ा के नजदीक सिकंदराबाद – शालीमार एक्सप्रेस ट्रेन के 3 डब्बे पटरी से उतर गईं। pic.twitter.com/xGRsooqGba
— Priyanshu Kumar (@priyanshu__63) November 9, 2024
हे देखील वाचा : अजित पवार अन् प्रकाश आंबेडकर यांची भेट! राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रेन क्रमांक 22850 शालीमार मेल एक्सप्रेस ही साप्ताहिक विशेष ट्रेन आहे. हावडा-खड़गपूर रेल्वे मार्गावर हा अपघात झाला, तिथे अचानक ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले. ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत होते. रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवा दल घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. सर्व बाधित प्रवाशांना हळूहळू बाहेर काढले जात आहे. अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.
दक्षिण पूर्व रेल्वेचे सीपीआरओ ओम प्रकाश चरण यांनी या अपघाताबाबत बोलताना म्हटले की, आज पहाटे 5.31 वाजता सिकंदराबाद-शालीमार एक्स्प्रेस नालपूर स्टेशनवर मिडल लाईनवरून डाउन लाईनकडे जात असताना रुळावरुन घसरली. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. आता प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्यासाठी 10 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पाठवल्यानंतर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. रेल्वे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विरोधकांसह प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे. रेल्वे रुळावरुन गाडी घसरल्याची ही पुन्हा एकदा घटना घडली आहे. आता हावडा रेल्वे स्थानकापासून 20 किलोमीटरवर हा अपघात झाला.