आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरुन जोडप्यांमध्ये घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातुही एक अशीच विचित्र घटना समोर आली आहे. येथे व्हिडिओ कॉल दरम्यान पत्नीच्या आयब्रो केलेल्या पाहून पती इतका संतप्त झाला की त्याने तिला सौदी अरेबियातून पत्नीला तिहेरी तलाक (Triple Talaq) दिला.
कुली बाजार येथील रहिवासी असलेल्या गुलसाबाने सांगितले की, तिचा विवाह 17 जानेवारी 2022 रोजी कोहना फुलपूर प्रयागराज येथील रहिवासी मोहम्मद सलीमसोबत अन्वरगंजमधील शालीमार गेस्ट हाऊसमध्ये झाला होता. लग्नादरम्यान 25 हजार रुपये हुंडा निश्चित करण्यात आला होता. गुलसाबा यांच्या म्हणण्यानुसार, 30 ऑगस्ट 2023 रोजी मोहम्मद सलीम कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला होता. त्यानंतर आम्ही रोज त्याच्याशी फोनवर बोलू लागलो.
[read_also content=”नवले पुल जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल, आंदोलकांनी आक्रमक होत घातला होता गोंधळ https://www.navarashtra.com/maharashtra/a-case-has-been-registered-against-400-to-500-people-in-the-navle-bridge-arson-case-nrps-476434.html”]
मात्र, सासरच्यांनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. हुंड्यामुळे तो खूश नसल्याने गाडीची मागणी करू लागला. छळाला कंटाळून ती प्रयागराजहून कानपूरला परतली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने सासरच्या लोकांचा छळ सहन केला कारण तिला विश्वास होता की एक दिवस तिचा नवरा परत येईल आणि सर्व काही ठीक होईल.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, 4 ऑक्टोबर 2023 रोजी तिच्या पतीने तिला IMO अॅपद्वारे व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी रात्रीचे साडेनऊ वाजले होते. नवरा काही वेळ बोलत राहिला. त्यानंतर अचानक तो म्हणाला की नकार देऊनही तू तुझ्या आयब्रो केल्यास, असं म्हणत नवऱ्याने फोन कट केला. तेवढ्यात त्याचा व्हॉईस कॉल आला आणि म्हणाला की तू माझ्या इच्छेविरुद्ध आयब्रो केल्या आहेत, म्हणून मी तुला तलाक देऊन लग्नाच्या बंधनातून मुक्त करतो आणि तिहेरी तलाक देऊन तू कॉल डिस्कनेक्ट केला.
या प्रकरणानंतर बायकोने पतीची खुप समजून काढण्याचा प्रयत्न केला पण पतीने ऐकलं नाही. पीडितेने सीएम पोर्टलवरही तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले की, लोहा मंडी चौकीच्या प्रभारीने पीडितेशी अनेक वेळा संपर्क साधला आणि एफआयआर नोंदवण्यास सांगितले पण ती आली नाही. कलेक्टरगंजचे एसीपी निशंक शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणी त्यांच्याकडे कोणतीही तक्रार किंवा अर्ज आलेला नाही. तक्रार आल्यावर तत्काळ एफआयआर नोंदवून कारवाई केली जाईल.