
"कोणी ब्राम्हण आपली मुलगी…"; आरक्षणाबाबत IAS अधिकाऱ्याची जीभ घसरली; CM कडे कारवाईची मागणी
मध्यप्रदेशमध्ये आयएएस अधिकाऱ्याचे वादग्रस्त विधान
ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या विधानाने खळबळ
मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
मध्यप्रदेश राज्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. एका आयएएस अधिकाऱ्याच्या वादग्रस्त विधानाने राजकारण तापले आहे. मध्यप्रदेशमधील आयएएस अधिकारी संतोष वर्मा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ब्राह्मण समाजाबाबत संतोष वर्मा यांनी विधान केले आहे. या विधानवरून त्यांच्यावर आता कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे केली जात आहे.
23 नोव्हेंबर रोजी AJJAKS (अनुसूचित जाति-जनजाति अधिकारी कर्मचारी संघ) च्या अधिवेशनात संतोष वर्मा यांनी प्रांताध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यावेळेस, “एका कुटुंबात एका व्यक्तीला आरक्षण मिळत राहिले पाहिजे, जोपर्यंत माझ्या मुलाला कोणी ब्राह्मण व्यक्ती त्याची मुलगी दान करत नाही किंवा त्यांच्याशी नाते जुळत नाही”, असे विधान संतोष वर्मा यांनी केले आहे.
Until a Brahmin donates his daughter to my son or has a relationship with him, reservations should continue – IAS Santosh Verma. Clearly, he became an IAS officer not due to talent but because of reservation, hence such cheapness.
The saddest part is, he will continue on his… pic.twitter.com/Uz4ZlhnRlc — Mr Sinha (@MrSinha_) November 25, 2025
मध्यप्रदेशमध्ये उडाली खळबळ
आयएएस अधिकारी संतोष वर्मा यांचा याबाबतचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण समाजाने या विधानाचा विरोध केला आहे. आयएएस अधिकाऱ्याचे वक्तव्य चुकीचे असल्याचे अखिल भारतीय ब्रम्हण संघाने म्हटले आहे. मुख्यमंतरो मोहन यादव यांना विनंती आहे की, या विधानाने समाज कुठे जाईल? ब्राह्मण समाज संतापलेला आहे. या अधिकाऱ्याला तत्काळ सेवेतून बाहेर काढण्याची विनंती आहे. अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाईल आणि त्याला सरकार व प्रशासन जबाबदार असेल, असे अखिल भारतीय ब्राह्मण समाजाने म्हटले आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ‘हे विधान अखिल भारतीय सेवेच्या आचरणाच्या विरुद्ध आहे. ब्राह्मण समाजाच्या सन्मानाचा अपमान करणारे आहे. भाजप सरकारमध्ये महिलांसाठी योजना चालवल्या जात आहेत, या सरकारमध्ये एक प्रशासकीय उच्च पदावरील अधिकारी मुलींबद्दल चुकीचे विधान करतो, ही योग्य नाही.
आयएएस अधिकाऱ्याने दिले स्पष्टीकरण
संतोष वर्मा म्हणाले, मला कोणतेही राजकारण करायचे नव्हते. आरक्षण आर्थिक आधारावर असले पाहिजे असा मुद्दा बैठकीत समोर आला होता. त्यावर मी म्हणालो, मी जर आर्थिकदृष्ट्या, समाजिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. माझ्या मनात कोणत्याही समाजाबाबत चुकीचे मत नाही. माझ्या विधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.