Bihar Elections 2025: येत्या काही दिवसांतच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यंदाची निवडणूक बिहारसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या विशेष सघन पुर्नपडताळणी म्हणजेच SIR वरून खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. एसआयआरच्या माध्यमातून मते चोरली जात आहेत, मतदार यादीतून ६५ लाख मतदारांची नावे वगळली जात आहेत. असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या मतचोरीच्या विरोधात राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव मत अधिकार यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करताना दिसत आहेत.
हे सुरू असतानाच दुसरीकडे बिहार निवडणुकीपूर्वी, जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मुस्लिमांबद्दल एक मोठे विधान केले आहे. मुस्लिम समुदायापर्यंत आपला विस्तार वाढवत प्रशांत किशोर यांनी घोषणा केली आहे. जनसुराज पक्ष बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोघांनाही या दोन समुदायाच्या पाठिंब्याने पराभूत करू शकतो, असा दावा केला आहे.
मंगळवारी (२६ ऑगस्ट) मोतिहारी येथे एका मेळाव्याला संबोधित करताना किशोर म्हणाले की, आज मी माझ्या मुस्लिम बांधवांना आमंत्रित करण्यासाठी आलो आहे. जर आम्हाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळाला तर आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपलाच हरवू असे नाही तर दोन वर्षांनी उत्तर प्रदेशात योगींनाही पराभूत करू.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१५ मध्ये नितीश कुमार यांना पुनरागमन करण्यास मदत केली होती. पण यावेळी प्रशांत किशोर यंनी पक्षाला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे साधन सादर करत किशोर म्हणाले की, जर ४० टक्के हिंदू आणि २० टक्के मुस्लिम एकत्र आले तर जन सूराजचा विजय निश्चित आहे.
Earthquake News : हिमालयाच्या कुशीत भीषण हालचाली, तिबेट पुन्हा थरथरला; 10 किमी खोलीवर केंद्रबिंदू
बिहारच्या गर्दीच्या राजकीय क्षेत्रात जनसुराज पक्षाला तिसरी शक्ती म्हणून उभे करण्यासाठी त्यांनी हिंदु-मुस्लिम दोन्ही समाजाला आवाहन केल आहे.जिथे भाजप आणि नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) यांचा समावेश असलेला सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या विरोधी महागठबंधनाच्या विरोधात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच झालेल्या सभेत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. मुख्यमंत्री आता राज्य करण्यासाठी योग्य नाहीत. ते आता म्हातारे झाले आहेत, त्यामुळे लोकांना आता नितीशच्या पलीकडे पाहण्याची गरज आहे. असल्याचा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला होता. दरम्यान, एकेकाळी नितीश कुमार यांचे विश्वासू अशी प्रशांत किशोर यांची ओळख होती. त्यांची मोहीम तळागाळातील लोकांचे एकत्रीकरण आणि हिंदी हृदयभूमीत भाजपच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी हिंदू-मुस्लिम युतीवर केंद्रित आहे. किशोर यांचा संदेश किती प्रभावी असेल हे येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत तपासले जाईल, जिथे जनसुराजचा राज्याच्या जटिल राजकीय रचनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.
एकेकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे विश्वासू मानले जाणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपल्या जन सुराज मंच आणि राज्यव्यापी ‘बिहार बदलाव यात्रा’द्वारे स्वतःला पर्यायी राजकीय शक्ती म्हणून उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. किशोर यांची मोहीम तळागाळातील लोकांना एकत्र करण्यावर केंद्रित असून, हिंदी हृदयभूमीत भाजपच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी हिंदू-मुस्लिम युतीचा संदेश देण्यात येत आहे. त्यांचा हा संदेश किती प्रभावी ठरेल, हे येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. जन सूरज राज्याच्या गुंतागुंतीच्या राजकीय समीकरणांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.