बीडमध्ये चाललंय तरी काय ? असा प्रश्न सतत विचारण्यात येत आहे. कारण बीड जिल्ह्यात गुन्हेगाराचे प्रमाण वाढतांना दिसत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हत्या, मारहाण, लूट अश्या अनेक घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता बीडच्या अंबाजोगाई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईतील साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाची डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली असून, मृत तरुणाचे नाव अविनाश शंकर देवकर (रा. रायगड नगर, अंबाजोगाई) असे आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
अंबाजोगाईतील रायगडनगर येथे राहणारा अविनाश शंकर देवकर याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे घडली. अज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. यात डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे अविनाशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. हल्ला इतका अचानक आणि निर्दयी होता की हॉटेल परिसरात काही काळ गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.यानंतर अविनाश देवकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला.या घटनेचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत. ही हत्या नेमकं कोणत्या कारणावरून करण्यात आली आणि अद्याप समजू शकलेले नाही.
प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले की अविनाशचा काही लोकांशी वाद होता का याची माहिती मिळालेली नाही. पोलीस सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे. या घटनेने परिसर हादरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
इंस्टाग्रामवर मित्राच्या प्रेयसीला पाठवले अश्लील मॅसेज, मित्राची मॉब लिंचिंग करत हत्या, नालासोपाऱ्यातील घटना
मुंबईच्या नालासोपाऱ्याच्या पूर्व मोरेगाव येथे इंस्टाग्रामवर मित्राच्या प्रेयसीला अश्लील मॅसेज पाठवल्याच्या रागातून मित्रांनीच मॉब लिंचिंग करत एक तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृतकाचे नाव प्रतीक वाघे (वय 24) असे आहे तर भूषण पाटील हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आरोपी हा व्यायाम पट्टू आहे.मृतक प्रतीक आणि आरोपी भूषण हे दोघेही तीन वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. दोघेही पूर्वी मीरारोडच्या भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होते. प्रतीक सध्या तेथेच कार्यरत होता. भूषण याने दोन वर्षांपूर्वी नौकरी सोडली होती. प्रतिकने भूषणच्या प्रेयसीला इंस्टाग्रामवर अश्लील मॅसेज पाठवल्यानंतर, भूषणने हा राग मनात धरला. 24 ऑगस्टच्या रात्री त्याने प्रतीकला मोरेगाव येथे बोलावून घेतले व ग्रुपसह बेदम मारहाण केली.