Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Air Pollution: दिल्लीतील प्रदूषणामागे ५१ तासांचा ‘गॅप’; आयआयटीएम पुण्याच्या संशोधनातून धक्कादायक माहिती!

Delhi Air Pollution: तापमानातील बदलाचा पीएम २.५वर परिणाम होण्यासाठी ५१ तासांपर्यंतचा विलंब होऊ शकतो. आर्द्रता आणि वाऱ्याच्या वेगाचा परिणामही काही तासांनी दिसून येतो. तापमानासाठी तीन, आर्द्रतेसाठी चार, पर्जन्यासाठी पाच, तर वाऱ्याच्या वेगासाठी सुमारे ११ तासांचा विलंब महत्त्वाचा आढळला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 15, 2026 | 05:06 PM
Delhi Air Pollution, IITM Pune Study, PM 2.5 Delhi,

Delhi Air Pollution, IITM Pune Study, PM 2.5 Delhi,

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील वायुप्रदूषणावर (PM 2.5) हवामान घटकांचा उशिराने (Lag effect) परिणाम
  • पुण्याच्या ‘आयआयटीएम’ (IITM) संस्थेतील शास्त्रज्ञ विवेक सिंग यांच्या संशोधनातून खुलासा
  • २०१७ ते २०२५ या कालावधीतील हवामान आणि पीएम २.५ च्या आकडेवारीचा अभ्यास
Delhi Air Pollution IITM Study:  दिल्लीतील जीवघेण्या वायुप्रदूषणामागे केवळ वाहनांचा धूर, औद्योगिक उत्सर्जन किंवा इतर मानवी कारणेच जबाबदार नसून हवामानातील बदलांचाही मोठा वाटा असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, तापमानातील बदल किंवा हवामानातील स्थितीचा परिणाम प्रदूषणाच्या पातळीवर तातडीने होत नसून काही हवामान घटकांचा प्रभाव तब्बल ५१ तासांच्या विलंबाने दिसून येतो. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आला आहे.

‘एन्व्हायर्नमेंटल सायन्स : ॲटमॉस्फिअर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. आयआयटीएमचे प्रमुख संशोधक विवेक सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१७ ते २०२५ या कालावधीतील दिल्लीतील हवामान आणि पीएम २.५ प्रदूषणाचा अभ्यास केला. तापमान, आर्द्रता, पर्जन्य, वाऱ्याचा वेग, सौर किरणोत्सर्ग, पृष्ठभागावरील दाब आणि वातावरणाच्या खालच्या थराची उंची (बाउंडरी लेअर हाइट) या घटकांचा पीएम २.५च्या पातळीशी असलेला संबंध तपासण्यात आला.

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर

हवामानाचा परिणाम उशिराने –

तापमानातील बदलाचा पीएम २.५वर परिणाम होण्यासाठी ५१ तासांपर्यंतचा विलंब होऊ शकतो. आर्द्रता आणि वाऱ्याच्या वेगाचा परिणामही काही तासांनी दिसून येतो. तापमानासाठी तीन, आर्द्रतेसाठी चार, पर्जन्यासाठी पाच, तर वाऱ्याच्या वेगासाठी सुमारे ११ तासांचा विलंब महत्त्वाचा आढळला.

हिवाळ्यात ५०० मीटरपेक्षा कमी होते बाउंडरी लेअर –

वातावरणाच्या खालच्या थराची उंची कमी झाल्यास प्रदूषकांना वरच्या वातावरणात पसरण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. हिवाळ्यात ही उंची ५०० मीटरपेक्षा कमी झाल्याने प्रदूषक जमिनीजवळ अडकतात आणि पीएम २.५ची पातळी झपाट्याने वाढते. कमी वाऱ्यामुळेही प्रदूषकांचा साठा वाढतो; तर वेगवान वारे प्रदूषकांचे विखुरण करण्यास मदत करतात.

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय

रात्री आणि हिवाळ्यात प्रदूषणाचा उच्चांक –

दिल्लीत सकाळी ६ ते ९ आणि रात्री ८ ते ११ या वेळेत प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आढळली. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान पीएम २.५ची पातळी अनेकदा २०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपेक्षा अधिक होती. अभ्यासाच्या कालावधीत ती कमाल ८७९.६ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत पोहोचल्याचे आढळले. याउलट, पावसाळ्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे ही पातळी ५०पेक्षा कमी होते.

नऊ वर्षांत सरासरी प्रदूषणात घट –

दिल्लीतील पीएम २.५च्या सरासरी पातळीत २०१७ ते २०२५ या कालावधीत संथ पण सातत्याने घट झाली आहे. २०१७ मधील १२७.७ वरून २०२५ मध्ये ही सरासरी ८० पर्यंत खाली आली. हवामान आणि प्रदूषणातील परस्परसंबंध स्पष्ट झाल्याने भविष्यात प्रदूषणाचा अंदाज आणि पूर्वसूचना प्रणाली अधिक अचूक करण्यास या संशोधनाची मदत होऊ शकते.

 

 

Web Title: Iitm pune study delhi air pollution pm 2 5 meteorological factors 51 hours lag effect

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Delhi Air Pollution

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.