१. भारतीय हवामान विभागाचा अनेक राज्यांना ऑरेंज अलर्ट.
२. पर्वतीय राज्यांमध्ये अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा
३. राजधानी दिल्लीत आज पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता
नवी दिल्ली/India Today Weather: सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यातच आज हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक राज्यांमधील नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. तर भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना कोणता इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.
दिल्ली शहरात देखील जोरदार पाऊस होत आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. आज हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दिल्लीकरांना पावसापासून आज थोडीशी विश्रांती मिळण्याचा अंदाज आहे. यमुना नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये कसे असणार वातावरण?
आज हवामान विभागाने उत्तर प्रदेशमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळू शकते. झाँसी, आग्रा,. हमीरपूरमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये राजधानी पाटणा आणि आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पर्वतीय राज्यांमध्ये कोसळधार
गेले अनेक दिवस उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पर्वतीय राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या व सर्व नागरिकांना सावधान राहण्याचा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
‘या’ राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने आज अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली या राज्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.