India Rain Alert: महाराष्ट्रासह 'या' दोन राज्यांत अतिवृष्टी होणार; तुफान पाऊस कोसळणार, IMD ने दिला रेड अलर्ट
नवी दिल्ली: देशात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पर्वतीय भागातील राज्ये, दक्षिण भारतातील काही राज्यांत , मध्य महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु आहे. राजधानी दिल्लीपासून राजस्थानपर्यंत मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आज हवामान विभागाने कोणत्या राज्यांना अलर्ट दिला आहे ते जाणून घेऊयात.
भारतीय हवामान विभागाने भारतातील अनेक राज्यांना जोरदार वाऱ्यासह, गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. आयएमडीने अनेक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील आज हवामान बदलले आहे. उत्तर प्रदेशमध्ये उन्हाळा जाणवत आहे. राजधानी लखनौमध्ये गरमा जाणवत आहे. मात्र मुझ्झफरनगर, मेरठ, झाँसी जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहार, बंगाल, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, झारखंड, विदर्भ, उत्तर भारतात हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या इशाऱ्यानुसार, आज काही राज्यांना रेड अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोंकण आणि गोवा या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. चिपळूण, खेड, मालवण, कणकवली आणि अन्य भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात नदी दुथड्या भरून वाहत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. महाबळेश्वरध्ये देखील पाऊस सुरु आहे. कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. शिवसागर जलाशयात मुसळधार पाऊस सुरु असल्याने कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा 27 जुलैपर्यंत मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ लगतच्या पूर्व मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर उर्वरित मराठवाडा आणि खानदेशात देखील पावसाचा अंदाज आहे.