India decision to block Pakistan water from Baglihar project on Chenab river
जम्मू – काश्मीर : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करुन पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सिंधू जल करार रद्द करण्यात आला आहे. याचबरोबर भारताने पाकिस्तानवर डिजीटल स्ट्राईक केली. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणीही पाकिस्तानसाठी बंद केले. आता त्यापुढे जाऊन चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यामुळे अनेक करार रद्द किंवा स्थगित करण्यात येत आहे. जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा भोवऱ्यात अडकला आहे. भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आता चिनाब नदीचे पाणी बागलीहार धरणाद्वारे रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पाकिस्तानच्या घशाला कोरड पडणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारताकडून पाकिस्तानच्या मुस्क्या आवळण्यात येत आहे. अनेक प्रकारची कारवाई करुन पाकिस्तानच्या अडचणींमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताकडून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नदीचे पाणी अडवले जात आहे. यापूर्वी सिंधू जल करार रद्द करण्यात आला. त्यानंतर आचा जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार प्रकल्पातील पाण्याचे वहन नियंत्रित करण्याची भारताकडे क्षमता आहे. तसंच, झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बागलीहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. यामुळे नदीच्या प्रवाहावर मोठा फरक पडतो.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
CRPF जवानाचे पाकिस्तानी मुलीशी लग्न
केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) कॉन्स्टेबल मुनीर अहमद यांना सेवा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता, पण याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली नव्हती. शिवाय, हा विवाह कोणत्याही अधिकृत मान्यतेशिवाय करण्यात आला होता. त्यामुळे नियमभंगाच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांना सेवेतून हटवण्यात आले आहे.मुनीर अहमद यांनी सुमारे अडीच महिन्यांपूर्वू पाकिस्तानच्या मीनल खान या नागरिकासोबत विवाह केला होता. विवाहानंतर मीनल खान व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि पुढे दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला. मात्र, तिच्या व्हिसाची मुदत 22 मार्च 2025 रोजी संपूनही ती भारतातच थांबली होती. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला होता. याच पार्श्वभूमीवर मीनल खानची दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखत झाली होती. ती अटारी-वाघा सीमेवर असताना, त्याच दिवशी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात तिच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या आदेशानंतर तिला पुन्हा सीमेवरून परत पाठवण्यात आले.