जम्मू आणि काश्मीरमध्ये या आठवड्यात ही तिसरी चकमक आहे. यापूर्वी, २८ जुलै रोजी, ऑपरेशन महादेव अंतर्गत, सुरक्षा दलांनी लिडवासच्या जंगलात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या ३ दहशतवाद्यांना ठार मारले होते.
दहशतवाद्यांना अन्न आणि पाणी दिल्याचा आरोप 23 वर्षीय इम्तियाज अहमद मागरे या तरुणावर होता. मात्र त्याने नदीमध्ये उडी मारल्यानंतर कुटुंबियांनी लष्करावर गंभीर आरोप केले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढतो आहे. सिंधू नदी करार रद्द करण्यात आल्यानंतर आता चिनाब नदीवरील बागलीहार प्रकल्पातून पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानी महिला आणि भारतीय पुरुषांशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा आता समोर आला आहे. यावरुन आता गुणरत्न सदवर्ते यांनी मत मांडले असून गंभीर आरोप केले आहेत.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. यामुळे भारताकडून पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असून याने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे.
काश्मिरींनी दहशतवाद आणि पाकिस्तानला उत्तर दिले आहे. जम्मू आणि काश्मीर विधानसभेने पहलगाम घटनेचा एकमताने निषेध केला आहे. पहलगामसारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी भारताकडून तयारी केली जात आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करुन पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 27 जणांचा बळी गेला आहे, या हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यावरुन हिंदू समाज आक्रमक झाला आहे. आरएसएसचे नेते प्रभाकर भट यांनी हत्यार ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
सुमारे ७०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये सहदेव नावाचा एक हिंदू राजा होता. त्यांना त्यांच्या प्रजेची काळजी नव्हती किंवा सरकार चालवण्यात रस नव्हता. त्यांचे पंतप्रधान आणि सेनापती रामचंद्र सहदेवाच्या नावाने राज्य करत होते.
पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय सैनिकाला ताब्यात घेतले आहे. अनावधाने बॉर्डर पार केलेल्या पूरम साहू हे सध्या पाकिस्तानच्या ताब्यामध्ये असून त्यांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी केली जात आहे.
Anna Hazare : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू जल करारावर स्थगिती दिली आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाबत वादग्रस्त विधान केले. यानंतर जोरदार टीका झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी माफी मागितली आहे.
भारतीय लष्कराकडून पाकिस्तानात घुसण्याची तयार सुरू झाली आहे. त्यासाठी आम्ही अधिकची मदत पाठवत आहोत. अशा परिस्थितीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत.
Mallikarjun Kharge letter to pm modi : कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष संसदीय अधिवेशनाची मागणी केली आहे.