Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr Manmohan singh Death : देशाचं ‘अर्थ’चक्र निखळलं ; पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधींनी व्यक्त केला शोक

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. डॉ. मनमोहन सिंह यांनी गुरुवारी रात्री ९:५१ वाजता  एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 27, 2024 | 02:39 AM
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधींनी व्यक्त केला शोक

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधींनी व्यक्त केला शोक

Follow Us
Close
Follow Us:

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी रात्री ९:५१ वाजता त्यांनी  एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सरकारकडून ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मनमोहन सिंह यांचा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान असा थक्क करणारा प्रवास राहिला आहे.  दरम्यान त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

देशाचं सर्वात मोठं नुकसान : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 

डॉ. मनमोहन सिंग हे फार वेगळं राजकीय व्यक्तिमत्व होतं. त्यांनी शिक्षण आणि प्रशासनात मोठं योगदान दिलं. विविध पदावरून भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास महत्वाचं योगदान दिलं. त्यांनी केलेली राष्ट्रसेवा, राजकीय जीवन आणि त्यांची विनम्रता आमच्या नेहमी स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने देशाचं सर्वात मोठं नुकसान झालं आहे. भारताच्या महान नेत्याला श्रद्धांजली अर्पण करते’,  अशा भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रतिष्ठित व्यक्तिमत्त हरपलं ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारतातील प्रतिष्ठित नेत्यांमधील व्यक्तिमत्व हरपलं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. ते सर्वसामान्य कुटुंबातून प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ झाले. त्यांनी पंतप्रधान, अर्थमंत्रिपदासहित विविध सरकारी पदावर काम केलं. त्यांनी आर्थिक विचारांची छाप भारताच्या आर्थिक धोरणार सोडली, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या.

India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji. Rising from humble origins, he rose to become a respected economist. He served in various government positions as well, including as Finance Minister, leaving a strong imprint on our economic… pic.twitter.com/clW00Yv6oP

— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2024

माझ्या मार्गदर्शकाला गमावलं : राहुल गांधी

‘मनमोहन सिंह यांनी बुद्धिमतेच्या जोरावर आणि प्रामाणिकपणे भारताचं नेतृत्व केलं. त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्रातील समज भारताला आणि जनतेला नेहमी प्रेरणा देत राहील. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबीयाप्रती संवेदना व्यक्त करतो. मी माझ्या मार्गदर्शकाला गमावलं आहे. आमच्यातील लाखो लोक त्यांचे चाहते होते. यापुढेही आम्ही अभिमानाने त्यांची आठवण काढू’, अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

Manmohan Singh Ji led India with immense wisdom and integrity. His humility and deep understanding of economics inspired the nation.

My heartfelt condolences to Mrs. Kaur and the family.

I have lost a mentor and guide. Millions of us who admired him will remember him with the… pic.twitter.com/bYT5o1ZN2R

— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 26, 2024

Web Title: India formor pm dr manmohan shing passes away pm narendra modi congress leader rahul gandhi raction all politicians 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 02:25 AM

Topics:  

  • Dr. Manmohan Singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.