भारतीय नौदलाची महासागरावर सतर्क नजर; थिनक्यू 2024 च्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत नौदल प्रमुखांनी मांडली भूमिका
नवी दिल्ली: भारतीय महासागर क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी भारताकडे आधुनिक प्रभावी यंत्राणा आहे. अशी माहिती भारतीय नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी दिली. दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, देशाच्या संरक्षणाबाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही. कोणत्याही गोष्टीसाठी भारताची सुरक्षा धोक्यात येणार नाही याकडे नौदलाचे लक्ष असते. भारताला महासागरातील विविध हाचालींची पूर्ण जाणीव आहे. कोणतेही धोके टाळण्यासाठी भारताचे नौदल सदैव सज्ज असते.
‘THINQ- 2024’ च्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेत नौदल प्रमुखांनी आपली भूमिका मांडली
भारतीय नौदलाच्या देशव्यापी THINQ- 2024 च्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या महाअंतिम फेरिदरम्यान ॲडमिरल त्रिपाठी यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, राष्ट्राच्या हिताच्या क्षेत्रातील कोणतेही हालचाल लक्षात येताच त्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येते. विशेष म्हणजे चीनच्या हालचालींवर भारतील नौदलाचे अत्यंत बारकाईपणे लक्ष असते.
‘नाविका सागर परिक्रमा-2’ अतंर्गत सहभागी होणाऱ्या महिलांचे कौतुक
यामुळे कोणत्याही हालचालींना प्रतिबंध घालण्यासाठी भारतीय महासागर क्षेत्रात मजबूत सुरक्षा सज्ज आहे.याशिवाय, नौदल प्रमुखांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य दिल्याचे देखील स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘नाविका सागर परिक्रमा-2’ अंतर्गत समुद्रात जगपरिक्रमा करणाऱ्या दोन तरुण महिला नौदल अधिकाऱ्यांबद्दल नौदलाला अभिमान आहे. समुद्रातील आव्हानांचा सामना करून हे अधिकारी आपल्या भूमिकेत यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
‘THINQ- 2024 ‘ स्पर्धेसाठी देशभरातील 12,600 शाळांचा सहभाग
‘THINQ- 2024‘ स्पर्धेसाठी देशभरातील 3,800 शहरे आणि 12,600 शाळांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून तरुण पिढीला संरक्षण आणि रणनीतीच्या महत्त्वपूर्ण बाबी समजून घेण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.दरम्यान, भारताचा लष्करी वारसा जतन करण्यासाठी ‘शौर्य गाथा’ प्रकल्पाची सुरुवात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते करण्यात आली.
लष्करी वारसा आणि महासागर क्षेत्राचे संरक्षण प्रल्पांवर भर
लष्करी वारशाचे संवर्धन, शैक्षणिक उपक्रम, आणि पर्यटन यांद्वारे देशाच्या लष्करी इतिहासाबद्दल जनजागृती करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. तसेच, दिल्लीतील भारतीय लष्करी हेरिटेज फेस्टिव्हलमध्ये लष्करी संशोधन, स्वावलंबन, आणि सामर्थ्य वाढविण्याच्या विविध उपक्रमांचे प्रदर्शनही करण्यात आले. भारताचा लष्करी वारसा आणि महासागर क्षेत्राचे संरक्षण यामध्ये नौदलाची भूमिकाही महत्वाची ठरत आहे, यावर नौदल प्रमुखांनी भर दिला.
हे देखील वाचा- इस्त्रायलचा लेबनॉनवर पुन्हा कहर; हवाई हल्ल्यात लहान मुलांसह 40 जणांचा मृत्यू