
India Defence Strength: आत्मनिर्भर भारताला मिळाली चालना; संरक्षण मंत्रालयाचा 'इतक्या' कोटींचा करार
India Defence Strength: भारताच्या सामरिक सामर्थ्यात भर पडणार आहे. संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी ४.२५ लाखांहून अधिक क्लोज-क्वार्टर बॅटल कार्बाइन आणि ४८ हेवी टॉपेंडो खरेदी करण्यासाठी ४,६६६ कोटी रुपयांचा करार केला. मंत्रालयाने सांगितले की, भारत फोर्ज लिमिटेड आणि पीएलआर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत २,७७० कोटी रुपयांचा करार केला. या करारांतर्गत, कार्बाइन आणि आवश्यक उपकरणे खरेदी केली जातील. त्यात म्हटले आहे की, ‘भारतीय सैनिकांना जागतिक दर्जाच्या अग्निशक्तीने सुसज्ज करण्याचा आणि जुन्या प्रणालींना अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाने बदलण्याचा हा प्रयत्न आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात अत्याधुनिक स्वदेशी उपकरणाचा वापर हा देशाच्या संरक्षणसाठी महत्वाचे आहे.
आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत ही पावले उचलली जात आहेत.’ भारतीय नौदल त्यांच्या कलवरी- श्रेणीच्या पाणबुड्यांसाठी ४८ हेवी टॉपेंडो आणि संबंधित उपकरणे खरेदी करेल. इटलीच्या वास सबमरीन सिस्टीम्स एसआरएलसोबत सुमारे १,८९६ कोटी रुपयांचा करार करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, या खरेदीमुळे सहा कलवरी श्रेणीच्या पाणबुड्यांची लढाऊ क्षमता वाढेल. यामुळे नौदलाला शत्रू राष्ट्रांचे पाणबुडी नष्ट करायचे आधुनिक शस्त्र मिळेल. ज्याने भारताच्या समुद्रातील भागावर लक्ष ठेवायला अनू युद्ध करायला सोप्पे जाईल.
एक दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्रालयाने ७९ हजार कोटींच्या कराराला मंजूरी दिली होती. संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) ची बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. तेव्हा या संबधित निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा: RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा
आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज टॉर्पेडो
अहवालांनुसार, हे टॉर्पेडो अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. त्यांच्याकडे उत्कृष्ट ऑपरेशनल क्षमता आहे. समुद्रात शत्रूच्या पाणबुड्यांचा सामना करण्यासाठी ते अत्यंत प्रभावी आहेत. या टॉपेंडोमध्ये लक्षणीय ऑपरेशनल क्षमता आणि प्रगत तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत. ही खरेदी विशेष तंत्रज्ञान आणि प्रगत शखे समाविष्ट करून भारतीय नौदलाच्या लढाऊ गरजा पूर्ण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.