आता बिनधास्त जा आयफेल टॉवर पाहायला! भारतीय फ्रान्समध्ये UPI द्वारे पेमेंट करू शकणार, भारत फ्रान्समध्ये झाला करार
पीएम मोदी म्हणाले, “आज प्रत्येक रेटिंग एजन्सी म्हणत आहे की भारत एक उज्ज्वल स्थान आहे. आता तुम्ही भारतात गुंतवणूक करा. हीच योग्य वेळ आहे. जे लवकर गुंतवणूक करतात त्यांना त्याचा फायदा मिळेल.
युनिफाइड पेमेंट इंटरफेस पेमेंट सिस्टम म्हणजेच (UPI) आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. या डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे गल्लीबोळातील भाजी विक्रेत्यापासून ते मोठ-मोठ्या दुकान, हॉटेलमध्ये झटपट व्यवहार सुरुळीत झाले आहे. मात्र, परदेशात व्यवहार करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पर्टकांनाही अडचण होते. ही अडचण लक्षता घेऊन सरकारने आता आर्थिक व्यवहार सुरु व्हावा यासाठी पाऊल उचललं आहे. युपीआयच्या वापराबाबत भारत (India) आणि फ्रान्स (France) यांच्यात करार झाला आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर तुम्ही तुमचे व्यवहार करु शकणार आहात. भारतीय पर्यटक आयफेल टॉवरजवळ यूपीआय वापरून रुपयात पैसे देऊ शकतील. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली.
[read_also content=”तुम्हालाही वेगवेगळ्या पर्स वापरणं आवडतं? मग जाणून घ्या, राशीनुसार कोणत्या रंगाची पर्स वापरावी https://www.navarashtra.com/lifestyle/which-color-purse-should-be-used-according-to-the-zodiac-sign-nrps-430936.html”]
आयफेल टॉवरपासून होणार सुरुवात
फ्रान्स येथील एका कला केंद्रात भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी हे सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारताच्या UPI पेमेंट सिस्टमच्या वापराबाबत फ्रान्ससोबत करार झाला आहे. त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होणार असून आता भारतीय पर्यटकांना आयफेल टॉवरमध्ये यूपीआय प्रणालीद्वारे रुपयात पैसे भरता येणार आहेत.’लायरा’ या ऑनलाइन पेमेंट प्रणालीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. परिणामी त्याचा येथे वापर होईल आणि भारतीय नवनिर्मितीसाठी मोठी बाजारपेठ उघडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी म्हणाले की, फ्रान्सने पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दीर्घकालीन पाच वर्षांचा व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय समुदायाला भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.ते म्हणाले की, भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येण्यासाठी वेगाने प्रगती करत आहे. तसेच, काही आठवड्यांत किंवा महिन्यांत महान तमिळ तत्त्वज्ञ तिरुवल्लुवर यांचा पुतळा फ्रान्समध्ये बसवला जाईल. अशीही माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान म्हणाले, “माझी फ्रान्सशी असलेली जोड खूप नातं आहे आणि ती मी कधीही विसरू शकत नाही.सुमारे 40 वर्षांपूर्वी अहमदाबाद, गुजरातमध्ये फ्रेंच सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यात आले होते आणि त्याच केंद्राचे पहिले सदस्य आज तुमच्याशी बोलत आहेत. पीएम मोदी म्हणाले की, भारत लोकशाहीची जननी आणि विविधतेची जननी आहे.ते म्हणाले, “ही आमची सर्वात मोठी ताकद आहे.भारतात 100 पेक्षा जास्त भाषा आहेत, 1,000 पेक्षा जास्त बोली आहेत.या भाषांमध्ये दररोज 32,000 हून अधिक वर्तमानपत्रे प्रकाशित होतात.
Web Title: India signs deal in france on indians can make payments through upi in france nrps