नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानला अडचणीत आणले आहे. तर भारताचे नागरिक, अनेक नेते पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याची मागणी करत आहेत. तर या हल्ल्यानंतर माजी वायुसेना प्रमुख आरूप रहा यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना ते विचार करू शकणार नाहीत अशी शिक्षा दिली पाहिजे असे ते म्हणाले आहेत.
पाकिस्तान पुसकरुत दहशतवाद्यांवर भारताने लष्करी कारवाई सुरू केली पाहिजे असे माजी हवाई दल प्रमुख आरूप रहा म्हणाले आहेत. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दोन आण्विक शक्ती असलेले देश युद्ध करू शकत नाहीत ही व्याख्या भारताने मोडून काढली आहे. भारताने उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना थोकण्याचे काम अधिक प्रभावीपणे केले आहे.
भारतीय सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा अशा प्रकारचे हल्ले करण्याची अधिक गरज आहे. जेणेकरून शत्रू राष्ट्राला कळेल की ते कोणाच्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून उरी आणि बालाकोटसारखे हल्ले करण्याची गरज आहे, असे माजी वायुसेना प्रमुख आरूप रहा म्हणाले.
दरम्यान भारताने काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. भारताने वाघा-अटारी बॉर्डर बंद केली आहे. भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर पाकिस्तानने देखील भारतसोबत व्यापार बंद केला आहे. भारतासाठी पाकिस्तानची हवाई सीमा बंद राहणार आहे. भारतीय नागरिकांना पाकिस्तान सोडण्यास सांगण्यात आले आहे.
‘नापाक’ संरक्षणमंत्री पुन्हा बरळले
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तान खवळला आहे. मात्र पाकिस्तानच दशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मान्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे विधान केले.
पहलगाममध्ये झालेला हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नसल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जेल नको हीच आमची भूमिका आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे.
Pahalgam Terror Attack: “…तर भारत सुरक्षित राहणार नाही”; ‘नापाक’ संरक्षणमंत्री पुन्हा बरळले
भारत आपल्यावर हल्ला करेल अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. दरम्यान भारताने यांच्या भूमीवर किंवा शहरांमध्ये दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. भारताला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराच ख्वाजा आसिफ यांनी दिला आहे. भारताने लष्करी युद्धाभ्यास सुरू केल्याचे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.