पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानच्या उलट्या बोंबा (फोटो- Ani)
नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. भारताने काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. दरम्यान यामध्येच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी उलटी भारतालाच धमकी दिली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तान खवळला आहे. मात्र पाकिस्तानच दशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मान्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला मुळखत देताना त्यांनी हे विधान केले.
पहलगाममध्ये झालेला हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नसल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जेल नको हीच आमची भूमिका आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे.
भारत आपल्यावर हल्ला करेल अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. दरम्यान भारताने यांच्या भूमीवर किंवा शहरांमध्ये दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. भारताला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराच ख्वाजा आसिफ यांनी दिला आहे. भारताने लष्करी युद्धाभ्यास सुरू केल्याचे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
भारताने घेतला पहलगामचा बदला
बांदीपोरा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्यात चकमक सुरु आहे. दरम्यान यामध्ये लष्कराला मोठे यश मिळाले आहे. लष्कराने लष्कर ए तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा केला आहे. भारताच्या जवानांनी लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लालीचा खात्मा केला आहे. बंदिपोरा येथे सैन्य दलाला हे यश मिळाले आहे. या संपूर्ण परिसराची लष्कराने कोंडी केली आहे. सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे.
Pahalgam Terror Attack: भारताने घेतला पहलगामचा बदला; ‘LET’ च्या टॉप कमांडर अल्ताफ लालीला ठोकला
भारतीय लष्कराला या टॉप कमांडरचा शोध होता. अखेर आज त्याला ठोकण्यात सैन्य दलाला यश आले आहे. मात्र या चकमकीत भारताचे २ जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल द्विवेदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. तर राहुल गांधी देखील पहलगाम दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळीच बांदीपोरा जिल्ह्यातील कलपुरा भागात सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
सीमारेषेजवळ उडाले ‘राफेल’ जेट्स
भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. तर काल सर्व पक्षांची एक बैठक देखील सरकारने घेतली आहे. मात्र आता भारतीय वायुसेना अॅक्शन मोडमध्ये आलेली आहे. भारतीय वायुसेनेने ‘आक्रमण’ ऑपरेशन ड्रिल केले आहे. ‘आक्रमण’ ड्रिलमध्ये भारतीय वायुसेनेच्या सर्वात अत्याधुनिक अशा राफेल जेट्सच्या नेतृत्वात आघाडीच्या लढाऊ ताफ्याचे प्रदर्शन करण्यात आले. भारतीय हवाई दलाकडे हरियाणातील अंबाला आणि पश्चिम बंगालमधील हशिमारा येथे दोन राफेल स्क्वॉड्रन तैनात आहेत. ही अत्याधुनिक विमाने सध्या सुरू असलेल्या सरावाच्या केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळाले.