नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याचा बदल भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणी हवाई हल्ला करून घेतला. यामध्ये शेकडो दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र यानंतर पाकिस्तान बिथरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारताच्या अनेक महत्वाच्या ठिकाणांना पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. याला भारताने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तीनही सैन्य दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. आज रात्री भारत पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने मिसाईल डागून जम्मू काश्मीर एअरबेस, पोखरण, अशा भारतीय सैन्य दलांच्या मुख्य ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या एस- 400 या यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले हवेतल्या हवेतच परतवून लावले. मात्र त्यानंतर भारताने देखील चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. काही ठिकाणी जोरदार उत्तर दिले जात आहे.
भारताने लाहोरमध्ये ड्रोन हल्ले केले आहेत. तसेच भारतीय नौदल देखील पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे समजते आहे. कुपवडा आणि सीमेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार केला जात आहे. त्याला भारतीय लष्कर सडेतोड उत्तर दिले जात आहे. तर तिकडे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि महत्वाच्या नेत्यांमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. आज रात्री भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो हे पहावे लागणार आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानचे एक F- 16 लढाऊ जेट पाडले आहे. सीमेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना लष्कराच्या एयर डिफेन्स तुकड्यांनीही प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी पाकिस्तानने जम्मूमधील एका हवाई तळावर रॉकेट डागले होते. मात्र भारतीय सेनेच्या सतर्कतेमुळे शत्रू सफल नाही झाले.
भारतीय लष्कराच्या आधुनिक S-400 मिसाइल डिफेंस सिस्टमने तातडीने कारवाई करत पाकिस्तानने डागलेल्या 8 क्षेपणास्त्रांना हवेतच उद्ध्वस्त केले आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्रांचे लक्ष्य जम्मू एअरस्ट्रीप होती, परंतु वेळीच प्रत्युत्तर दिल्याने मोठे नुकसान टळले.
भारतीय लष्कराने जम्मू विद्यापीठाजवळ दोन ड्रोन पाडल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर आता श्रीनगर विमानतळावर देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थान सारख्या सीमेलगतच्या बहुतांश भागांमध्ये ब्लॅकआऊट पाळले जात आहे.