पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच; सांबा जिल्ह्यात दिसले संशयित ड्रोन, सुरक्षा यंत्रणांना समजताच...
जम्मू : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून 27 जणांची हत्या केली होती. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध आणखीनच ताणले गेले आहेत. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. मात्र, तरीही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुरुवारी रात्री दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरु करण्यात आले होते.
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. तसेच भारताने राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, करकही, रावळपिंडी या महत्वाच्या ठिकाणी जोरदार हल्ला केला. भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये देखील 60 किमी आत घुसला असल्याचे समजत आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारतीय तिन्ही दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताच्या तिन्ही दलाकडून पाकिस्तानची कोंडी करण्यात आली आहे. LOC वर देखील गोळीबार सुरु झाला, सीमा भागामध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.
याशिवाय, परिसरामधील लाईट, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. भारताने इस्लामाबाद, कराचीवर हल्ला करण्यात आला. कराची बंदरावर देखील भारताच्या ‘आयएनएस विक्रांत’कडून हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर महत्त्वाच्या शहरांमध्ये भारताच्या वायू दलाने हल्ला केला आहे. पाकिस्तान सेनेच्या मुख्यालयावर देखील भारताने हल्ला केला आहे.
पाकिस्तानचे 4 वैमानिक ताब्यात
भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे 4 पायलट पकडले असल्याचे समोर येत आहे. तसेच भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानला घेरले आहे. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. राजधानीवर देखील भारताने हल्ला केला आहे. तर भारतीय नौदलाने आयएनएस विक्रांतने पाकिस्तानच्या कराची बंदरावर मोठा हल्ला केला आहे.
भारताचा पाकिस्तानवर ‘काऊंटर अटॅक’
भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर अशा महत्वाच्या ठिकाणी हल्ला केला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने ‘ऑल आउट वॉर’ची घोषणा केली आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला केला आहे.
हेदेखील वाचा : India Vs Pakistan War Live: भारत POK च्या 60 किमी आत घुसला अन्…; पाकिस्तानचे 4 पायलट जेरबंद