Big Breaking: भारतीय तटरक्षल दलाचे हेलिकॉप्टर कोसळले; 3 जणांचा मृत्यू, गुजरातमधील घटना
पोरबंदर: गुजरातच्या पोरबंदर विमानतळावर एक भीषण अपघात झाला आहे. पोरबंदर येथे भारतीय कोस्ट गार्ड म्हणजेच तटरक्षक दलाचे विमानतळ आहे. हा अपघात याच विमानतळावर घडला आहे. गुजरातच्या पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे समजते आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#UPDATE | Porbandar ICG ALH Helicopter crash | Out of the three missing crew members, the bodies of two of them, Commandant Vipin Babu and P/NVK Karan Singh, have been recovered. Search operations for Commandant Rakesh Kumar Rana are still underway: Porbandar Coast Guard DIG… https://t.co/klzWWk03WB pic.twitter.com/ZbRD5gR1gP
— ANI (@ANI) September 3, 2024
भारतीय तटरक्षल दलाचे एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर ध्रुव हे नियमित प्रशिक्षणासाठी हवेत उड्डाण करत होते. त्यावेळेस त्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. दरम्यान हे हेलिकॉप्टर गुजरातच्या पोरबंदर एअरपोर्टवर उतरत असताना तयाचा अपघात झाला. या भीषण अपघतामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. काही महिन्यांपूर्वी देखील समुद्रामध्ये तटरक्षक दलाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते.
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला
उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी (4 जानेवारी, 2025) भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळण्याची घटना घडली. या अपघातात किमान दोन सैनिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यावेळी रुग्णालयात 5 जखमींना आणण्यात आले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला होता. 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.सैनिकांना घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकला बांदीपोरा येथील कूट पायीन भागाजवळ एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेतील जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सुरक्षा दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. गेल्या 20 दिवसांत लष्कराच्या वाहनाला अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. या अपघातात दहशतवादी कोन असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. मात्र, सध्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 20 दिवसांत लष्कराच्या वाहनाला अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे.
हेही वाचा: Breaking News : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, अपघातात 2 जवान शहीद
३१ डिसेंबरलाही रस्ता अपघात
बरोबर चार दिवसांपूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 2024 रोजी पूंछ जिल्ह्यातील मेंढारमधील एलओसीजवळील बलनोई भागात लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. हा अपघात संध्याकाळी सहा वाजता घडला, जेव्हा अनेक जवानांना घेऊन लष्कराचे वाहन ऑपरेशनल ड्युटीवर जात होते. वाटेत अपघात झाला आणि लष्कराचे वाहन सुमारे 100 फूट खोल खड्ड्यात पडले. या अपघातातही पाच जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
तसेच 4 नोव्हेंबर 2024 रोजी राजौरी जिल्ह्यात वाहन रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याने लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले होते.तर दुसरा जवान जखमी झाला होता. 2 नोव्हेंबर 2024 रोजी, रियासी जिल्ह्यात एक कार डोंगराच्या रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडल्याने एक महिला आणि तिच्या 10 महिन्यांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले. आता शनिवारी बांदीपोरा येथे लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने दोन जवांना वीरमरण आले आहे, तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.