
Indian Tejas fighter jet crashed:
Indian Tejas fighter jet crashed: दुबई एअर शोमध्ये एका प्रात्यक्षिकादरम्यान एक भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. विमान कोसळतानाचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तेजस जेट आकाशात एरोबॅटिक्स करताना दिसत आहे आणि नंतर अचानक जमिनीवर कोसळले. विमान जमिनीवर कोसळताच मोटा स्फोट झाला आणित्यानंतर मोठ्या प्रमाणात आगीचे लोट उडाले. दरम्यान, तेजस जेटमधील वैमानिक बाहेर पडला की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Indian Tejas fighter jet crashed)
मिळाेलेल्या माहितीनुसार, दुबईतील अल मकतूम विमानतळावर सुरू असलेल्या एअर शोमध्ये डेमो फ्लाइट दरम्यान हा अपघात झाला. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहेे. शुक्रवारी दुबई वेळेनुसार दुपारी २:१० आणि भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता हा अपघात झाला. अपघातादरम्यान तेजसचा पायलट बाहेर पडला की नाही हे सध्या स्पष्ट नाही. विमान कोसळताच त्याला आग लागली आणि विमानतळावर धुराचे लोट दिसले.
अपघातानंतर, भारतीय हवाई दलाने लढाऊ विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी न्यायालय स्थापन केले आहे. हवाई दलाच्या तेजस जेट अपघाताची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, २०२४ मध्ये, राजस्थानमधील पोखरण येथे एका युद्धाभ्यास दरम्यान इंजिन बिघाडामुळे तेजस विमान कोसळले होते. (International News)
दुबई एअर शोमध्ये आंतरराष्ट्रीय विमाने प्रदर्शित केली जातात. त्यासाठी जगभरातील एरोस्पेस कंपन्या दुबईमध्ये जमल्या होत्या. प्रमुख एरोस्पेस कंपन्या, विमान कंपन्या, हवाई दल आणि तंत्रज्ञान कंपन्या त्यांचे नवीन विमान, हेलिकॉप्टर, शस्त्रास्त्र प्रणाली आणि एरोस्पेस तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येणार होते. शुक्रवारी पाच दिवसांच्या एअर शोचा शेवटचा दिवस होता.
दुबई एअर शो १९८९ मध्ये सुरू झाला आणि दर दोन वर्षांनी दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केला जातो. तेजसने सहभागी होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. तेजसची किंमत ₹६०० कोटी आहे.
दुबई एअर शो हा जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावशाली एरोस्पेस इव्हेंटपैकी एक आहे, परंतु त्याची सुरुवात तितकी भव्य नव्हती. १९८६ मध्ये “अरब एअर” या नावाने तो सुरू झाला तेव्हा तो फक्त एक लहान नागरी विमान वाहतूक व्यापार मेळा होता. १९८९ मध्ये दुबई विमानतळावर पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये फक्त २०० प्रदर्शक आणि २५ विमाने सहभागी झाली होती. तेव्हा कोणीही कल्पना केली नव्हती की हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठ्या जागतिक एरोस्पेस शोमध्ये वाढेल.
२०२५ चा दुबई एअर शो या उत्क्रांतीचे एक उत्तम उदाहरण होता. १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान दुबई वर्ल्ड सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जवळजवळ संपूर्ण जागतिक एरोस्पेस उद्योग एकत्र आले होते. १,५०० हून अधिक कंपन्यांनी भाग घेतला, २०० हून अधिक प्रगत विमाने प्रदर्शित करण्यात आली आणि ११५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उल्लेखनीय म्हणजे, ४४० नवीन सहभागींनी त्यांच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन देखील केले. याव्यतिरिक्त, १२ प्रमुख परिषदा आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये संरक्षण, अंतराळ, संशोधन, नवीन तंत्रज्ञान आणि भविष्यातील विमान वाहतूक आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आज हा कार्यक्रम जागतिक संरक्षण आणि अंतराळ उद्योगासाठी सर्वात महत्त्वाचा व्यासपीठ मानला जातो. देश त्यांचे नवीन लढाऊ विमान, ड्रोन, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र प्रणाली, हवाई संरक्षण तंत्रज्ञान आणि प्रगत उड्डाण-संबंधित नवकल्पना प्रदर्शित करतात. शिवाय, प्रमुख संरक्षण करार, सहकार्य करार आणि भविष्यातील भागीदारी देखील या व्यासपीठावर अंतिम केली जातात.