दिल्ली दहशतवादी हल्ल्याचे डॉ. उमर याचे तुर्कीचेमध्ये ट्रेनिंग आणि जैशकडून पैसा घेतल्याचे समोर आले (फोटो - सोशल मीडिया)
Delhi Blast : नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 24 जण गंभीर झाले. लाल किल्ला या गजबजलेल्या परिसरामध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याने संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाचा जोरदार तपास सुरु असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. दिल्लीत दहशतवादी कट रचणाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय ट्रीप करुन ट्रेनिंग घेतले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाचे कनेक्शन हे थेट तुर्कीपर्यंत येऊन पोहचले आहे. दिल्लीमध्ये व्हाईट कॉलर डॉक्टरांचे कनेक्शन समोर आले. उच्चशिक्षित डॉक्टरांनी हा कट घडवून आणला. हे डॉक्टर जैश दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आले. जैशच्या एका हँडलरने ४० बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ पाठवले. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचा हँडलर हंजुल्ला याने अटक केलेल्या आरोपी डॉ. मुझम्मिल शकीलला ४० बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ पाठवले होते. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हंजुल्ला हे त्याचे कोडनेम होते. जम्मू आणि काश्मीरमधील नौगाममध्ये जैशच्या पोस्टर्सवर “कमांडर हंजुल्ला भैया” हे नाव देखील आढळून आले आहे, ज्यामुळे एजन्सींच्या संशयाला आणखी बळकटी मिळाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हनझुल्लाची ओळख डॉ. मुझम्मिलशी मौलवी इरफान अहमद यांनी करून दिली होती. इरफान हा तो माणूस आहे ज्याने डॉक्टरांसह मिळून एक व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल तयार केला होता. दिल्लीतील बॉम्बस्फोट त्या कटाचा एक भाग होते. या स्फोटाचा सूत्रधार डॉ. उमर 2022 मध्ये तुर्कीमध्ये एका सीरियन दहशतवाद्याशी भेटला होता, अशी धक्कादायक माहिती तपासात मिळाली. डॉ. मुझम्मिल शकील गनई आणि डॉ. मुझफ्फर रायदर हे देखील त्यावेळी उपस्थित होते. हे तिघेही त्यांच्या पाकिस्तानी हँडलर उकाशाच्या सांगण्यावरून सीरियन दहशतवाद्याला भेटले.
पीठ गिरणीत युरिया दळून बनवली स्फोटके
एनआयएने डॉ. मुझम्मिल गनई, डॉ. शाहीन सईद, डॉ. आदिल अहमद राथेर आणि मौलवी इरफान यांना अटक केली आहे. फरीदाबादमधील धौज गावातून एक पीठ गिरणी, एक धातू वितळवण्याचे यंत्र आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली तेव्हा तपासादरम्यान एक मोठा खुलासा झाला. मुझम्मिलने या पीठ गिरणीत युरिया ग्राउंड केला, नंतर तो मशीनमध्ये रिफायन केला आणि स्फोटके तयार करण्यासाठी प्रयोगशाळेतून चोरलेल्या रसायनांमध्ये मिसळला. त्याच्या माहितीच्या आधारे, गिरणी एका अटक केलेल्या टॅक्सी चालकाच्या घरी सापडली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
टॅक्सी ड्रायव्हरने एनआयएला सांगितले की, त्याचा मुलगा अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला तेव्हा तो डॉ. मुझम्मिलला भेटला. उपचारादरम्यान त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर मुझम्मिलने त्याला त्याच्या नेटवर्कमध्ये सामील केले. ९ नोव्हेंबर रोजी, पोलिसांनी धौजमधील त्याच खोलीतून ३६० किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटके जप्त केली. १० नोव्हेंबर रोजी, फतेहपूर टागा येथील त्याच्या दुसऱ्या भाड्याच्या खोलीतून २५५८ किलो संशयास्पद स्फोटके सापडली.






