नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच जगातील विनाशकारी तंत्रज्ञानाबाबत चिंता व्यक्त केली आहे. डोवाल यांनी सांगितले की, AI सोबतच विघटनकारी तंत्रज्ञानामुळे भविष्यात सायबर धोक्यांची गंभीरता वाढेल. सायबर सुरक्षेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे’.
‘ब्रीक्स’च्या मित्र देशांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी डोवाल दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे दाखल झाले आहेत. यामध्ये त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्लोबल साउथला विशेषतः संसाधनांच्या मर्यादांवर मात करण्याची गरज आहे. या संदर्भात भारत नेहमीच आघाडीवर असेल आणि ग्लोबल साऊथसोबत जवळून काम करेल, असे डोवाल यांनी म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारख्या विघटनकारी तंत्रज्ञानाच्या आगमनाने सायबर धोक्याची तीव्रता झपाट्याने वाढेल, असेही सांगितले आहे.
तरुण लोकसंख्येचा उल्लेख केला
डोवाल यांनी सायबर गुन्हेगार आणि दहशतवादी यांच्यातील दुव्याबद्दल सांगितले. यामध्ये वित्तपुरवठा, मनी लाँड्रिंग, कट्टरतावाद, भरती आणि सुरक्षित संप्रेषणासाठी सायबरस्पेसचा वापर समाविष्ट आहे. तरुण लोकसंख्या विशेषतः सोशल मीडिया साइट्सद्वारे अतिरेकी विचारसरणीच्या प्रसारास असुरक्षित आहे.