Tamilnadu News: तामिळनाडू विधानसभेत एक अनपेक्षित घटना घडली. राज्यपाल आर.एन. रवी संबोधित करण्यासाठी विधानसभेत पोहोचले होते. सभेपूर्वी राष्ट्रगीत होणार होते. पण विधानसभेत राष्ट्वगीताचाच अपमान झाला. तामिळनाडू विधानसभेत फक्त “तमिळ थाई वाझाथु” हे गाणे गायले गेले. पण राष्ट्रगीत गायले गेले नाही. राज्यपाल आर. एन. रवी यांच्या लक्षात आल्याने ते प्रचंड नाराज झाले आणि रागारागातत अभिभाषन न करताच त्यांनी विधानसभा सोडली. त्यांच्या या अचानक जाण्याने विधानसभेत एकच चर्चा सुरू झाली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
विधानभवनातून बाहेर पडल्यानंतर राज्यपालांनी राजभवना गाठले, त्यानतंर राजभवनाच्या सोशल मीडियावर ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आज पुन्हा एकदा तमिळनाडू विधानसभेत भारताच्या संविधानाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान झाला. संविधानानुसार राष्ट्रगीत गाणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे आणि ते राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आधी व नंतर सादर होणे अपेक्षित आहे.” राज्यपालांनी मुख्यमंत्री एम.के. स्टालिन आणि विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रगीत सादर करण्याची विनंती केली होती, मात्र त्यांच्या या विनंतीला नकार दिला गेला. त्यामुळे ते नाराज झाले आणि सभागृह सोडण्याचा निर्णय घेतला.
“मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटातून मिळणार “देवाचं घर नक्की कुठे असतं?
संविधान आणि राष्ट्रगीताच्या सन्मानावर चर्चा
राज्यपाल आर.एन. रवि यांनी केवळ ३ मिनिटांत सभागृह सोडले. त्यांचा असा दावा होता की, जेव्हा राष्ट्रगीत सादर करण्याची परवानगीच दिली जात नाही, तेव्हा त्या वातावरणात राहणे योग्य नाही. त्यांच्या या कृतीमुळे विधानसभा सत्र अचानक राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकले. राज्यपालांच्या या निर्णयामुळे तमिळनाडूच्या राजकारणात नवीन प्रश्न निर्माण झाले असून संविधान आणि राष्ट्रगीताच्या सन्मानावर गहन चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय प्रतिक्रिया तीव्र
राज्यपालांच्या या कृतीवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सत्ताधारी पक्षाने या घटनेला सामान्य प्रोटोकॉलचे उल्लंघन म्हटले, तर विरोधी पक्षांनी याला गंभीर आणि संवेदनशील विषय मानले आहे. या घटनेनंतर तमिळनाडू विधानसभेत संविधान व राष्ट्रगीताच्या सन्मानावरून नवीन वाद उभा राहिला आहे.
Brahmin Reservation: “ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिथे
फेब्रुवारीमध्ये, राज्यपालांनी विधानसभेला पारंपारिक भाषण देण्यास नकार दिला होता, असे म्हटले होते की मसुद्यात “अनेक परिच्छेद आहेत ज्यात दिशाभूल करणारे दावे आहेत जे सत्यापासून दूर आहेत.” राज्यपालांच्या अभिभाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी राष्ट्रगीताला योग्य तो मान देऊन वाजवावे, असेही राजभवनाने म्हटले आहे.
2022 मध्ये, RN रवी यांनी ‘द्रविड मॉडेल’ या वाक्याशिवाय आणि तामिळनाडूमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे काही संदर्भ असलेल्या भाषणातील काही भाग वाचण्यास नकार दिला ज्यामध्ये BR आंबेडकर, पेरियार, CN अन्नादुराई यांची नावे होती. सभागृहाने केवळ अधिकृत भाषणे रेकॉर्ड करण्याचा आणि राज्यपालांचे भाषण रेकॉर्ड न करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतरही त्यांनी राष्ट्रगीताची वाट न पाहता सभात्याग केला.