मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिने नोव्हेंबर महिन्यात जुळ्या बालकांना जन्म दिला. आज ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल हे दोघे जुळ्या बाळांसह प्रथमच भारतात दाखल होणार असून त्यांच्या स्वागतासाठी अंबानी कुटुंबाकडून जंगी तयारी केली आहे. सकाळी साडेआठ वाजता हे दोघेही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले असून यांसोबत अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही आहेत.
300 किलो सोन करणार दान :
ईशा अंबानी आणि उद्योगपती आनंद पिरामल या दोघांना 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांच्या स्वरूपात कन्यारत्न आणि पुत्ररत्न झाले होते. यापैकी मुलाचे नाव कृष्ण आणि मुलीचे नाव आदिया ठेवण्यात आले आहे. थोड्यावेळातच कतार एअरलाईन्सच्या स्पेशल विमानानं लॉस अँजलिसवरुन ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे मुंबईत येणार असून बाळांच्या स्वागतासाठी ईशा अंबानीच्या ‘करुणा सिंधू’ निवासस्थानावर देशभरातील एक हजार साधूसंत येणार आहेत. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहेत. तसेच अंबानी आणि पिरामल कुटुंबाकडून पाच अनाथाश्रम सुरु केली जाणार आहेत. जगभरातील फेमस शेफ याप्रसंगी पंचपक्वान्न बनवणार आहेत. तसेच, तिरुपती, द्वारका येथूनही मिष्ठान्न आणण्यात येतील
Isha Ambani baby girl ‘Adiya’ with Nita Ambani
जुळ्या बाळांसाठी शाही थाट :
बाळांसाठी Hermes, Dior या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचं फर्निचर आणि नर्सरी ‘करुणा सिंधू’ आणि ‘अँटेलिया’मध्ये तयार करण्यात आली आहे. बाळांसाठी dolce gabbana, Gucci, Loro piana या ब्रँडचे खास कपडे तयार करण्यात आले आहेत. बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करण्यात आली आहे. बाळांची देखभाल करण्यासाठी अमेरिकेहून आठ स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या नॅनी येणार आहेत.