ISRO ने श्रीहरिकोटा येथून SSLV मिशनचे शेवटचे रॉकेट केले लाँच
श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शुक्रवारी श्रीहरिकोटा येथून स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (SSLV) चे अंतिम रॉकेट अंतराळाच्या क्षेत्रात प्रक्षेपित केले. इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोट येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ९.१९ वाजता SSLV लाँच केले. SSLV चे हे तिसरे आणि शेवटचे विकासात्मक उड्डाण असेल. यानंतर रॉकेट पूर्णपणे तयार मानले जाईल. याद्वारे इस्रोला कमी खर्चात छोटे उपग्रह प्रक्षेपित करणे शक्य होणार आहे. यावेळी हे रॉकेट SSLV EOS-08 उपग्रहदेखील सोबत घेऊन जाईल. हा उपग्रह पृथ्वीची छायाचित्रे घेईल आणि हवामानाची माहितीही देईल.
हे रॉकेट २४ तास पृथ्वीची छायाचित्रे घेईल
SSLV म्हणजे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल. हे 34 मीटर लांब आहे आणि 500 किलो पर्यंत वजन वाहून नेऊ शकते. हे रॉकेट लहान उपग्रह सोडण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यापूर्वी इस्रोने जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही रॉकेट सोडले होते. EOS-08 उपग्रह तीन विशेष उपकरणांनी सुसज्ज आहे. प्रथम इलेक्ट्रो-ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड. तसेच हे रॉकेट दिवस आणि रात्रदेखील पृथ्वीची छायाचित्रे घेईल. आणि सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेल यामुळे आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणीय देखरेख आणि सुरक्षिततेसाठी मदत होईल.
🚀SSLV-D3/EOS-08🛰️ Mission:
The launch of the third developmental flight of SSLV is scheduled for August 16, 2024, in a launch window of one hour starting at 09:17 Hrs. IST pic.twitter.com/JWxq9X6rjk
— ISRO (@isro) August 12, 2024
पुराचा इशाराही देईल
या रॉकेटमधील दुसरे साधन म्हणजे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम रिफ्लेक्टोमेट्री पेलोड. त्यातून समुद्राचा पृष्ठभाग, जमिनीतील ओलावा आणि हिमालयातील हिमनद्यांविषयी माहिती मिळेल. तसेच पुराचा इशाराही लवकरात देईल. तिसरे साधन सिलिकॉन कार्बाइड अल्ट्राव्हायोलेट डोसमीटर आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ते अतिनील किरणोत्सर्गाचे निरीक्षण करेल. याव्यतिरिक्त हे गॅमा रेडिएशन शोधण्यात देखील मदत करेल.
हे देखील वाचा : इस्रायलशी युद्धाचा चटका सौदीपर्यंत पोहोचला; क्राऊन प्रिन्सचा जीव धोक्यात!
भारताची पकड मजबूत होईल
ही मोहीम यशस्वी झाल्यास इस्रोचा व्यावसायिक विभाग न्यूस्पेस इंडिया लिमिटेड खाजगी कंपन्यांसाठीही उपग्रह प्रक्षेपित करू शकेल. यामुळे भारताची अंतराळातील पकड आणखी मजबूत होईल. EOS-8 मोहिमेबाबत इस्रोने सांगितले की, या मोहिमेचा मुख्य उद्देश मायक्रोसॅटलाइट विकसित करणे हा आहे. तसेच, भविष्यातील उपग्रहांसाठी नवीन उपकरणे तयार करणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे