पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची नोकरी जाणार? काय आहेत प्रोटोकॉल अन् जिन्हिवा करार?
पाकिस्तानच्या हद्दीत चुकून प्रवेश केलेले बीएसएफचे जवान पी. के. साहू यांना पाकिस्तानने भारताकडे सुपूर्द केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या तणावादम्यान ते सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. जवळपास 20 दिवसांनंतर, पाकिस्तानने त्यांना अटारी वाघा सीमेवरून भारतात परत पाठवलं आहे. पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केलेल्या साहू यांना नोकरी गमवावी लागणार का? काय आहेत प्रोटोकॉल आणि जिन्हिवा करार? जाणून घेऊया…
पंतप्रधानांच्या भाषणाने बदलली जागतिक संरक्षण बाजारपेठेची धारणा; राफेलमध्ये तेजी…
काय आहे जिन्हिवा करार?
दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण जग होरपळून निघालं होतं. लाखो सैनिक आणि लोकांना प्राण गमवावे लागले. या युद्धानंतर अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येत ‘ जिनिव्हा ‘ कराराची निर्मिती केली.
या करारानुसार युद्ध झालंच तर क्रूरतेला आळा घालणे, नागरिकांचं रक्षण करणं, युद्धात जखमी झालेल्या आणि कैद केलेल्या सैनिकांशी योग्य व्यवहार करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या देशाचा नागरिक किंवा जवान सापडला तर त्याला तात्काळ उपचार देणं गरजेचं असतं. तसंच योग्य वेळेनंतर त्यांना त्या देशात पाठवावं लागतं.
एखादा जवान चुकून सीमारेषा ओलांडून दुसऱ्या देशात गेला, तर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया शक्य असते.
जवानांना परत पाठवण्याची प्रक्रिया कशी असते?
दुसऱ्या देशाचा सैनिक सीमा ओलांडून आपल्या देशात आला असेल तर प्रथम ओळख पटवली जाते. शिवाय त्याचा हेतू तपासला जातो.
ध्वज बैठक : अशा परिस्थितीत दोन्ही देशांच्या फ्लॅग मीटिंग होतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वारंवार ‘फ्लॅग मीटिंग्स’ घेतल्या जातात. दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी संवाद साधतात.
शांततेच्या मार्गाने सुटका : सैनिक जर चुकून गेला आहे आणि त्याच्याकडे कोणताही गुप्त हेतू नव्हता, हे स्पष्ट झाल्यानंतर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु होते.
या प्रक्रियेला बिलंब होऊ शकतो. तपास, राजनैतिक प्रक्रिया आणि संवाद आवश्यक असतो.
अशा घटनेनंतर, पाकिस्तानातून परतणाऱ्या कोणत्याही सैनिकाला नोकरीवरून काढून टाकलं जातं नाही. मात्र काही दिवस त्याला कोणत्याही मोहिमेत सहभागी करून घेतलं जात नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी हा निर्णय घेतला जातो. जेव्हा ते पूर्णपणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरे होतात तेव्हा त्यांना त्यांच्या कर्तव्यावर परत घेतलं जातं. परंतु शेजारच्या देशातून मायदेशात परतल्यानंतर त्यांना ताबडतोब ड्युटीसाठी बोलावले जात नाही.