जबलपूर : मध्य प्रदेशातील ( Madhya Pradesh Crime ) प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या जबलपूरमध्ये एक खळबळजनक हत्याकांड घडल्याचे ( sensational murder case ) निदर्शनास आले आहे. पोलिसांनी हत्येचे गूढ उघडल्यावर सगळेच चक्रावून ( CCTV cameras captured ) गेले. एखादा मित्र आपल्याच मित्राला इतक्या निर्दयतेने मारू शकतो हे कोणालाच समजत नव्हते. पैशांचा व्यवहार आणि चारित्र्याच्या संशयातून ही निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अनुपम स्कूटी चालवताना :
आश्चर्यकारक बाब म्हणजे मृत्यूच्या 9 दिवसांनंतरही मृताच्या मोबाईलवरून मेसेज आले असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो स्कूटी चालवताना दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला असता संपूर्ण प्रकरण समजले. खुनाच्या आरोपीने ही घटना इतक्या हुशारीने घडवून आणली होती की, कोणालाच काही समजले नाही. पण, असे म्हणतात की, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो नेहमीच काही ना काही सुगावा सोडत असतो.
अनुपमच्या कुटुंबीयांना बेपत्ता झाल्यानंतर मेसेज :
वास्तविक, 45 वर्षीय अनुपम शर्मा 16 फेब्रुवारी 2023 पासून बेपत्ता होते. तो कुठे आहे, नातेवाइकांनाही याबाबत काहीच माहिती नव्हती. अखेर अनुपमच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 16 फेब्रुवारीलाच अनुपम यांची हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अनुपम यांच्या मोबाईलवरून कुटुंबीयांना शेवटचा संदेश २५ फेब्रुवारीला आला होता. त्यावेळी त्याचे ठिकाण नाशिकमध्ये होते. शेवटच्या मेसेजमध्ये अनुपम यांनी कथितरित्या लिहिले की, ‘मी अध्यात्माच्या मार्गावर निघालो आहे. मी आश्रमात आलो आहे. यापुढे मी मूक उपोषणाला बसणार आहे. माझ्या चुकांमुळे मी हा मार्ग निवडत आहे.
पोलिसांना प्रश्न पडला कोण करीत होते मेसेज :
अनुपमचा मित्र टोनीचाही २५ फेब्रुवारीला मृत्यू झाला. प्रश्न निर्माण होऊ लागले की, अनुपमनंतर टोनीही या जगात नाही, मग यामागचे रहस्य काय? आता 50 दिवसांनंतर या खुनाचा पर्दाफाश झाला आहे. अनुपमचा आधी गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर त्याच्या मृतदेहाचे करवतीने 8 तुकडे करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. जबलपूरचे एसपी तुषार कांत विद्यार्थी यांनी सांगितले की, अनुपम शर्मा बेपत्ता झाल्याची तक्रार संजीवनी नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तेव्हापासूनच हे प्रकरण संशयास्पद वाटू लागले. अनुपमचा मित्र टोनी याने ही हत्या केल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. हत्येतील आरोपी टोनीने त्याचा भाडेकरू रामप्रकाश पुनियाचाही यात समावेश केला होता. रामप्रकाश हा अनुपमच्या मोबाईलवरून मेसेज करीत होता, जेणेकरून तो जिवंत असल्याचे समजते.
मृत व्यक्ती मृत्यूनंतरही स्कूटी चालवताना :
हत्येचा तपास सुरू असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली.हत्येनंतरही अनुपम स्कूटी चालवताना दिसला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहून पोलिसांनाही धक्का बसला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला, त्यानंतर खेळ समजला. वास्तविक, रामप्रकाशने अनुपमचे कपडे घालून स्कूटी चालवली होती, जेणेकरून लोकांना वाटेल की अनुपम जिवंत आहेत. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, अनुपमने टोनीला 25 लाख रुपये दिले होते आणि आता तो त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागला. यानंतर टोनीने रामप्रकाशसोबत एक भयंकर कट रचला.
Web Title: Jabalpur massacre in madhya pradesh brutal murder of a friend by friend