Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Attack: मोठी अपडेट! दहशतवादी लपले होते डोंगराच्या मागे, स्थानिक मदतनीसच ठरले भेदी; दिला आश्रय, NIA चा मोठा खुलासा

Pahalgam terror attack : पहलगाम हल्लाप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. 22 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात एनआयएने मोठा खुलासा केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 23, 2025 | 01:18 PM
मोठी अपडेट! दहशतवादी लपले होते डोंगराच्या मागे, स्थानिक मदतनीसच ठरले भेदी; दिला आश्रय, NIA चा मोठा खुलासा (फोटो सौजन्य-X)

मोठी अपडेट! दहशतवादी लपले होते डोंगराच्या मागे, स्थानिक मदतनीसच ठरले भेदी; दिला आश्रय, NIA चा मोठा खुलासा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam terror attack in Marathi : पहलगाम हल्लाप्रकरणात मोठी अपडेट समोय येत असून 22 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मोठे यश मिळाले आहे. हत्याकांडाच्या दोन महिन्यांनंतर एनआयएने स्पष्ट केले की, या हल्ल्याला स्थानिक लोकांचा पाठिंबा होता. रविवारी (22 जून) एनआयएने पहलगाममधील दोन दहशतवाद्यांना मदतनीसांना अटक केली, ज्यांनी हल्ल्यापूर्वी तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना जेवण, निवास आणि रेकी करण्यात मदत केली होती, असा खुलासा NIA कडून करण्यात आला आहे.

गरीब कुटुंबाना मिळणार 2 लाख रुपये; नितीश कुमारांची घोषणा, नक्की काय आहे योजना?

पहलगाम हल्लाप्रकरणातील चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी कबूल केले की पर्यटकांना मारणारे तीन पाकिस्तानी दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे होते. दोघांची चौकशी अजूनही सुरू आहे. त्यांचे मोबाईल फोन आणि इतर उपकरणे तपासल्यानंतर, एनआयएला अनेक सुगावा सापडले आहेत. हल्ल्यानंतर, सुरक्षा यंत्रणांनी संशय व्यक्त केला होता की या हल्ल्याला स्थानिक लोक मदत करत आहेत. काश्मीर-केंद्रित पक्षांनी यावर बरेच राजकारणही केले होते.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन परिसरात दहशतवाद्यांनी २५ पर्यटक आणि एका स्थानिक घोडेस्वाराची हत्या केली. हल्ल्यानंतर दहशतवादी तेथून पळून गेले. सुरक्षा यंत्रणांनी दावा केला की, या हल्ल्यात पाच दहशतवादी सहभागी होते, त्यापैकी दोन स्थानिक होते आणि एक पाकिस्तानी होता. पहलगाम हल्ल्यानंतरच भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले.

हत्येचा तपास एनआयएकडे सोपवल्यानंतर, प्रत्येक पैलूची कसून चौकशी करण्यात आली. एनआयएला आधीच माहित होते की या प्रकरणात फक्त एक स्थानिकच मदत करू शकतो. प्रत्येक लहान दुव्याला जोडून, ​​एनआयए टीम मदत करणाऱ्यांपर्यंत पोहोचली. दहशतवादी सहाय्यक, परवेझ अहमद जोथड, रा. बटकोट, पहलगाम आणि बशीर अहमद जोथड, रा. हिलपार्क, पहलगाम यांना त्यांच्या लपण्याच्या ठिकाणावरून अटक करण्यात आली.

हल्ल्यानंतर दोघेही त्यांचे लपण्याचे ठिकाण बदलत होते असे सांगितले जाते. चौकशीदरम्यान दोघांनीही सांगितले की पहलगाम हत्याकांडापूर्वी त्यांनी लष्कराच्या तीन दहशतवाद्यांना एका ढोकमध्ये ठेवले होते आणि त्यांना रेशन, पाणी आणि इतर उपकरणेही पुरवली होती. हल्ल्याच्या काही काळापूर्वीपर्यंत तिन्ही दहशतवादी ढोकमध्ये लपून बसले होते. येथेच त्यांनी संपूर्ण हत्याकांडाची योजना आखली होती. हल्ल्यानंतर दहशतवादी दुसऱ्या कुठल्यातरी लपण्याच्या ठिकाणी गेले. हिलपार्क पहाडी आणि बैसरणपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहे. चौकशीदरम्यान, दोन्ही दहशतवाद्यांचे साथीदार भूतकाळात कधी दहशतवाद्यांसाठी काम करत होते का किंवा ते पहिल्यांदाच कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते का हे देखील तपासले जात आहे.

आरोपींना न्यायालयात हजर

एनआयएने दोन्ही आरोपींना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक केली आहे. न्यायालयात हजर झाल्यानंतर दोघांनाही रिमांडवर घेतले जाईल आणि त्यांच्याकडून हल्ल्याचा कट, दहशतवादी संघटनांशी असलेले त्यांचे संबंध आणि दहशतवाद्यांना मदत करण्याच्या इतर बाबींबद्दल माहिती मागितली जाईल. यासोबतच, पाकिस्तानी दहशतवाद्यांचे सहकार्य आणि मदत देखील तपासली जाईल.

चौकशीदरम्यान एनआयएने आरोपींचे मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली आणि त्यांची तपासणी केली. या उपकरणांमध्ये संशयास्पद कॉल, संदेश आणि इतर माहिती शोधण्यात आली, जेणेकरून दहशतवादी नेटवर्कमधील इतर सदस्यांची ओळख पटवता येईल. याशिवाय, दहशतवाद्यांच्या पाकिस्तानशी असलेल्या संपर्कांबद्दल अनेक सुगावा सापडला.

२५० संशयास्पद घटकांची चौकशी

संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहलगाम हत्याकांडानंतर एनआयएसह विविध सुरक्षा संस्थांनी पहलगाम आणि त्याच्या आसपासच्या परिसरांसह संपूर्ण खोऱ्यातील २५० संशयास्पद घटकांची चौकशी केली. यामध्ये मोठ्या संख्येने माजी दहशतवादी आणि त्यांचे जुने मदतनीस होते. यापैकी सुमारे १०० घटकांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रत्येक दहशतवाद्यावर २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दोन दहशतवादी साथीदारांना अटक करणे हे या प्रकरणातील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे.

तीन फरार दहशतवाद्यांचा शोध सुरू

हल्ला करणारे तीन दहशतवादी अजूनही फरार आहेत. स्थानिक सहाय्यकांना अटक केल्याने आता दहशतवाद्यांचा शोध घेणे सोपे होईल, असा एनआयए अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. स्थानिक सुरक्षा दलांसह एजन्सीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी विशेष मोहिमा सुरू केल्या आहेत. एनआयएला संशय आहे की हे तीन दहशतवादी काश्मीरमध्ये लपले आहेत.

एनआयएने सुरक्षा व्यवस्था मजबूत

भविष्यात असे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी एनआयएने दहशतवाद्यांचे समर्थन नेटवर्क नष्ट करण्यासाठी देखील पावले उचलली आहेत. गेल्या काही काळापासून, सुरक्षा दल सतत दहशतवाद्यांचे सहाय्यकांना अटक करत आहेत, अशी माहिती मिळत आहे.

तेलापासून विमान वाहतुकीपर्यंत…; इस्रायल-इराण संघर्षाचा भारतावर होणारे परिणाम

Web Title: Jammu and kashmir srinagar pahalgam terrorists were hiding behind the mountain local helpers revealed their secrets to nia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • kashmir
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
1

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का
2

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का

Malegaon Bomb Blast Case:  ‘ती’ चिमुरडी वडापाव आणण्यासाठी गेली ती परत आलीच नाही…, १७ वर्षांनंतर निकालाची आली वेळ
3

Malegaon Bomb Blast Case: ‘ती’ चिमुरडी वडापाव आणण्यासाठी गेली ती परत आलीच नाही…, १७ वर्षांनंतर निकालाची आली वेळ

Operation Sindoor: “कान उघडे ठेवून ऐका…”; राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं
4

Operation Sindoor: “कान उघडे ठेवून ऐका…”; राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.