Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झारखंडचे मुख्यमंत्री चंमाई सोरेन यांचा राजीनामा, हेमंत सोरेन बनणार मुख्यमंत्री

झारखंडचे मुख्यमंत्री चंपत सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री पदाची उद्या गुरुवार दि.४ जुलै रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे.

  • By नारायण परब
Updated On: Jul 03, 2024 | 09:51 PM
सौजन्य- X

सौजन्य- X

Follow Us
Close
Follow Us:

झारखंड: झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंपाई सोरेन यांनी राजभवनात झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. हेमंत सोरेन यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. चंपाई सोरेन आज संध्याकाळी राजीनामा देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या आमदारांसह राज्यपालांच्या कार्यालयात पोहोचले.

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) द्वारे चौकशी करत असलेल्या जमीन व्यवहाराशी संबंधित प्रकरणात हेमंत सोरेन यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर चंपाई सोरेन राजीनामा देतील. अशी चर्चा होती ती  आज खरी ठरली आहे. राज्यातील पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या आमदारांमध्ये एकमत झाल्यानंतर हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून परत येणार आहेत.

चंपाई सोरेन यांनी राजभवनातून बाहेर पडल्यानंतर सांगितले की “झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या निर्णयानुसार मी राजीनामा दिला आहे. आमची युती मजबूत आहे,” ते म्हणाले, “हेमंत सोरेनजींचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. आघाडीच्या भागीदारांनी मला जबाबदारी दिली होती. आता हेमंत सोरेन जी यांच्या बाजूने आघाडीने निर्णय घेतला आहे.”

उद्या गुरुवारी घेऊ शकतात हेंमत सोरेन मुख्यमंत्रीपदाची शपथ

हेमंत सोरेन हे उद्या गुरुवारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. राज्यपाल कार्यालयाकडून उद्याच्या शपथविधीच्या वेळेसंबंधी माहिती दिली जाईल. असे राजभवनामध्ये आलेल्या आमदार आणि मंत्र्यांनी सांगितले.

हेमंत सोरेन यांची २८ जून रोजी झाली जामिनावर सुटका

कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात २८ जूनला हायकोर्टाने जामीन मंजूर केला. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर जवळपास पाच महिन्यांनी तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. हेमंत सोरेन यांनी ३१ जानेवारीला अटक होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लोकसभेच्या निवडणूकीमध्येही त्यांच्याशिवाय झामुमो पक्षाने प्रचार केला. त्यांच्या पत्नी कल्पना मुर्मु सोरेन यांनी पक्षाच्या  प्रचाराची धुरा सांभाळली होती.  झारखंडमध्ये हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधी पक्षांना आणखी बळ मिळणार आहे.

Web Title: Jharkhand chief minister chammai sorens resignation hemant soren will become the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2024 | 09:50 PM

Topics:  

  • hemant soren
  • Jharkhand

संबंधित बातम्या

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान
1

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान

‘ती’ एक हत्या जिने शिबू सोरेन यांना ‘दिशाम गुरु’ बनवलं; झारखंड अन् आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्याची संघर्षमय कहाणी
2

‘ती’ एक हत्या जिने शिबू सोरेन यांना ‘दिशाम गुरु’ बनवलं; झारखंड अन् आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्याची संघर्षमय कहाणी

Shibu Soren Passed Away : शिबू सोरेनचा मृत्यूचे कारण काय? झारखंडच्या ‘गुरुजीं’ना नक्की झाले तरी काय?
3

Shibu Soren Passed Away : शिबू सोरेनचा मृत्यूचे कारण काय? झारखंडच्या ‘गुरुजीं’ना नक्की झाले तरी काय?

Jharkhand Accident: ट्रकच्या भीषण धडकेत बसचा चक्काचूर; देवघरमध्ये १८ भाविकांचा दुर्दैवी अंत
4

Jharkhand Accident: ट्रकच्या भीषण धडकेत बसचा चक्काचूर; देवघरमध्ये १८ भाविकांचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.