Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyoti Malhotra Pakistan Connection: ज्योती मल्होत्राचा पाय खोलात, पाकिस्तान कनेक्शन उघड; पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

यासोबतच, केस डायरीमध्ये ज्योतीच्या सर्व परदेश प्रवासांचाही उल्लेख आहे. ज्योती मल्होत्रा 'ट्रॅव्हल विथ जिओ' नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवत होती, तिला पोलिसांनी १६ मे २०२५ रोजी अटक केली होती

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 16, 2025 | 05:30 PM
Jyoti Malhotra Pakistan Connection: ज्योती मल्होत्राचा पाय खोलात, पाकिस्तान कनेक्शन उघड; पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
Follow Us
Close
Follow Us:

Jyoti Malhotra Pakistan Connection: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावर आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हिसार पोलिसांनी हे २५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस तपासात ज्योतीचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. हरियाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केलेल्या आरोपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात पाकिस्तानकडून टूलकिटप्रमाणे ज्योतीचा वापर केला जात असल्याचे नमुद कऱण्यात आले आहे.

याशिवाय ज्योती मल्होत्राने भारतातील अनेक गोष्टींची माहिती पाकिस्तानी एजंट्सला शेअर केल्या होत्या. ती सतत त्यांच्या संपर्कात होती. ज्योती तिच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान तिथल्या एजंट्सला संपर्क साधायची. ज्योतीच्या मोबाईल फोनवरून पोलिसांना अनेक संवेदनशील माहितीही मिळाल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या दानिश अली यांच्यासोबत ज्योती मल्होत्रा सतत संपर्कात होती. पोलिसांना ज्योती आणि दानिश यांच्यातील चॅट्सही सापडले आहेत. ज्योती आयएसआय एजंट्स शकीर, हसन अली आणि नासिर ढिल्लन यांच्याशी बोलत असे. ज्योती आणि हसन नावाच्या एजंटमधील चॅट्सही पोलिसांना सापडले आहेत.

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

केस डायरीमध्ये ज्योतीच्या सर्व परदेश प्रवासांचा उल्लेख

यासोबतच, केस डायरीमध्ये ज्योतीच्या सर्व परदेश प्रवासांचाही उल्लेख आहे. ज्योती मल्होत्रा ‘ट्रॅव्हल विथ जिओ’ नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवत होती, तिला पोलिसांनी १६ मे २०२५ रोजी अटक केली होती आणि तेव्हापासून ती न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात, हरियाणा पोलिसांनी अनेक सोशल मीडिया प्रभावकांना समन्स जारी करून त्यांची चौकशी केली होती. पाकिस्तान उच्चायोगात तैनात असलेले एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांना हेरगिरीच्या आरोपांवरून १३ मे रोजी हद्दपार करण्यात आले. दरम्यान, ज्योती मल्होत्रा यांच्याविरुद्ध अधिकृत गुप्तता कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि चीनच्या दौऱ्यामुळे ज्योती संशयाच्या भोवऱ्यात आली. २०२४ मध्ये ज्योती मल्होत्रा २ महिन्यांच्या आत पाकिस्तान आणि नंतर चीनला गेली. येथूनच सुरक्षा यंत्रणांना ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रावर संशय आला. १७ एप्रिल २०२४ रोजी ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली. १५ मे पर्यंत पाकिस्तानात राहिल्यानंतर ती भारतात परतली. त्यानंतर २५ दिवसांनंतर ती १० जून रोजी चीनला गेली आणि जुलैपर्यंत चीनमध्ये राहिली. त्यानंतर ती १० जुलै रोजी काठमांडूला पोहोचली. यापूर्वी ती करतारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानला गेली होती, जिथे तिने पंजाबचे मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज शरीफ यांची भेट घेतली आणि तिची मुलाखतही घेतली.

Russia-Ukraine war: पुतिनशी चर्चेनंतर ट्रम्प घेणार झेलेन्स्कीची भेट; लवकरच नाटो देशांच्या प्रमुखांशी करणार

हिसार येथील रहिवासी ३३ वर्षीय मल्होत्रा ‘ट्रॅव्हल विथ जिओ’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवत असे. तिला १६ मे २०२५ रोजी अटक करण्यात आली. हेरगिरीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली भारताने १३ मे रोजी पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एहसान-उर-रहीम उर्फ दानिशला हद्दपार केले होते.

 

Web Title: Jyoti malhotras pakistan connection exposed police files chargesheet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • Jyoti Malhotra

संबंधित बातम्या

Youtuber Jasbir Singh : ‘जासूस’ जसबीरच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानचे १५० नंबर, युट्यूबर ज्योतीसोबतच्या फोटोमुळे आला रडारवर
1

Youtuber Jasbir Singh : ‘जासूस’ जसबीरच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानचे १५० नंबर, युट्यूबर ज्योतीसोबतच्या फोटोमुळे आला रडारवर

Jyoti Malhotra : आणखी एक युट्यूबर ज्योती मल्होत्राचा मित्र देशद्रोही निघाला; पाकिस्तानमध्ये गेला अन्…
2

Jyoti Malhotra : आणखी एक युट्यूबर ज्योती मल्होत्राचा मित्र देशद्रोही निघाला; पाकिस्तानमध्ये गेला अन्…

लिंबू-मिरच्या नाही, तर घराबाहेर लटकवतात पुरूषांचे गुप्तांग, गुप्तहेर ज्योती मल्होत्राने केला व्हिडीओ शूट
3

लिंबू-मिरच्या नाही, तर घराबाहेर लटकवतात पुरूषांचे गुप्तांग, गुप्तहेर ज्योती मल्होत्राने केला व्हिडीओ शूट

हेरगिरीच्या नवीन युक्त्या अन् स्लीपर सेल; सोशल मीडियाचा गैरवापर करतोय सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण
4

हेरगिरीच्या नवीन युक्त्या अन् स्लीपर सेल; सोशल मीडियाचा गैरवापर करतोय सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.