कोकणाला पावसाचा रेड अलर्ट (फोटो- ani)
१. राज्यभरात पावसाचा जोर वाढला.
२. कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी
३. अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
Heavy Rain in Kokan: आज सर्वत्र दहीहंडी आणि गोकुळाष्टमीचा उत्साह आहे. सर्वात अत्यंत उत्साहात दहीहंडी साजरी केली जात आहे. दरम्यान याच मुहूर्तावर वरुणराजाने देखील हजेरी लावली आहे. राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. अनेक नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. दरम्यान आज हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्याला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणासाठी देखील हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या काही दिवसांत कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. अरबी समुद्र देखील खवळला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात अत्यंत जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणाला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि पुण्यासाठी देखील उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुणे जिल्ह्यात देखील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. पुणे शहर आणि उपनगर परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने जोर धरला आहे. सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. शिवसागर जलाशयाची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढवला अथवा सुरु केला जाण्याची शक्यता आहे. चिपळूण तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. नादिकने इशारा पातळी जवळपास गाठली आहे. पावसाचा जोर कमी न झाल्यास शहरात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे,