Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keralam New CM: व्ही.डी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्रीपदी; काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

Keralam New CM- मुख्यमंत्रीपदासाठी व्हीडी सतीशन यांच्या नावाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. सूत्रांकडूनही त्यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची पसंती असल्याची माहिती समोर येत होती.

  • By anuradha sagar
Updated On: May 14, 2026 | 01:32 PM
Keralam New CM V.D. Satheesan, Kerala Election Results 2026,

Keralam New CM V.D. Satheesan, Kerala Election Results 2026,

Follow Us
Follow Us:
  • केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला पूर्णविराम
  • काँग्रेसने व्ही.डी. सतीशन यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती
  •  पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब
 

Kerala Election Results 2026: केरळच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्रीपदासाठी चार नावांची जोरदार चर्चाही सुरू होती. अखेर काँग्रेसकडून केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी (Keralam New CM)  व्ही.डी. सतीशन  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेद्वारे काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर एआयसीसीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी निर्णयाचे स्वागत केले. “मी या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. व्हीडी सतीशन यांचे अभिनंदन करतो. केरळच्या जनतेने यूडीएफच्या बाजूने मोठा कौल दिला आहे. सतीशन यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या अपेक्षा आणि दिलेली आश्वासने पूर्ण करेल, असा विश्वास आहे,” असे त्यांनी म्हटले. तसेच, “काँग्रेस पक्ष आणि पक्षश्रेष्ठी केरळ सरकारच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहतील,” असेही वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.

Next CM of Kerala: केरळमध्ये काँग्रेसचा ‘सस्पेन्स’ कायम; ‘या’ तीन

दिल्लीतील बैठकीनंतर निर्णय

मुख्यमंत्रीपदासाठी व्हीडी सतीशन यांच्या नावाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. सूत्रांकडूनही त्यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची पसंती असल्याची माहिती समोर येत होती. अखेर ती चर्चा खरी ठरली असून काँग्रेसने अधिकृत घोषणा केली आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

Kerala Assembly Election : केरळात झाली तिरंगी लढत; आता राज्यातील ..

जयराम रमेश यांचे संकेत

बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी माध्यमांशी संवाद साधताना 14 मे रोजी मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा केली जाईल, असे संकेत दिले होते. केरळमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाने अधिकृत मंजुरी दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी सर्व चर्चा पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले होते.

यूडीएफला स्पष्ट बहुमत

140 सदस्यीय केरळ विधानसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट (United Democratic Front) आघाडीने 102 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मात्र निकाल लागल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय जाहीर न झाल्याने काँग्रेसवर टीका होत होती. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सनी जोसेफ यांनीदेखील मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयातील विलंबामुळे विजयाची चमक कमी होत असल्याचे मान्य केले होते. अखेर पक्षाने व्हीडी सतीशन यांच्या नावाची घोषणा करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Web Title: Keralam new cm vd satheesan named new chief minister of keralam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Congress
  • National Politics

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
3

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’
4

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.