Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवासी थोडक्यात बचावले! Indigo ची ‘ही’ फ्लाईट चक्क 2 तास…; मध्यरात्री नेमके घडले तरी काय?

Indigo Flight: फ्लाईट सुरक्षितपणे लँड झाल्यावर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. इंडिगोने प्रवाशांना दुसरे विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 06, 2025 | 02:16 PM
प्रवासी थोडक्यात बचावले! Indigo ची ‘ही’ फ्लाईट चक्क 2 तास…; मध्यरात्री नेमके घडले तरी काय?
Follow Us
Close
Follow Us:

इंडिगोच्या फ्लाईटचे लॅंडींग 
कोचीवरुन अबुधाबीला जात होती फ्लाईट 
दोन तास हवेतच होते घिरट्या घालत

Indigo Flight Emergency Landing:  कोचीवरुन अबुधाबीला जाणारे इंडिगोचे विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा काही काळाने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले आहे. दरम्यान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीला जाण्यासाठी indigoच्या फ्लाईटने उड्डाण केले. मात्र विमानात गडबड झाल्याने हे विमान पुन्हा कोची विमानतळावर उतरवण्यात आले आहे.

कोचीवरुन अबुधाबीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात काहीतरी गडबड झाल्याने हे विमान पुन्हा कोचीत उतरवण्यात आले. पायलट प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता फ्लाईट पुन्हा कोचीत उतरवली. मात्र याधी विमान दोन तास हवेतच घिरट्या मारत असल्याचे समोर आले आहे. अबुधाबीला जाण्यासाठी विमानाने रात्री 12.30 वाजता उड्डाण केले होते. दरम्यान 2.30 वाजण्याच्या सुमारास हे विमान पुन्हा कोचीत लँड करण्यात आले.

फ्लाईट सुरक्षितपणे लँड झाल्यावर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. इंडिगोने प्रवाशांना दुसरे विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. विमानात काही तांत्रिक अडचण झाल्याने हे विमान पुन्हा कोचीत लँड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कंपनीच्या तांत्रिक विभागाने फ्लाईटची तपासणी सुरू केली आहे.

या घटनेबद्दल इंडिगोने अजून अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र दोन तास विमान हवेतच घिरट्या घालत असल्याने प्रवासी घाबरले होते. फ्लाईट सुखरूप लँड होताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान सगळे प्रवासी सुखरूप आहेत.

indiGo च्या विमानाला पक्षी धडकला

नागपूरमध्ये इंडिगोच्या एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. इंडिगोचे विमान नागपूरहून कोलकात्याला जात होते. विमान 6E812 ने उड्डाण करताच, एक पक्षी हवेत आला आणि इंजिनला धडकला. उड्डाणानंतर काही वेळातच पक्ष्याची विमानाला धडक बसली यामुळे विमानाचा पुढचा भाग खराब झाला. परंतु वैमानिकाने हवेत यू-टर्न घेण्याचा निर्णय घेतल्याने नागपुरात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

२७२ प्रवासी थोडक्यात बचावले! IndiGo च्या विमानाला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय

इंडिगोचे 6E812 विमानाने सकाळी 7 वाजून 5 मिनिटाने उड्डाण घेतले. आकाशात झेप घेताच एका पक्षाने धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षी धडकल्याने विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.या विमानात माजी आमदार सुधाकर कोहळे, शेखर भोयर आणि काँग्रेस नेते नितीन कुंभलकर प्रवास करत होते. विमानाच्या आपत्कालीन लँडिंगनंतर आता वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही यांचे विधान समोर आले आहे. ते म्हणाले की, इंडिगोच्या नागपूर-कोलकाता फ्लाइट क्रमांक 6E812 वर पक्षी धडकण्याची शक्यता आहे. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Kochi to abu dhabi indigo flight emergency landing after 2 hours in air know the reason breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • Abu Dhabi
  • Flight Landing
  • IndiGo

संबंधित बातम्या

२७२ प्रवासी थोडक्यात बचावले! IndiGo च्या विमानाला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
1

२७२ प्रवासी थोडक्यात बचावले! IndiGo च्या विमानाला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय

मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर…
2

मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर…

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले
3

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

अरे चाललंय तरी काय? Air India च्या बोईंग विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; कोझिकोड एअरपोर्टवर…
4

अरे चाललंय तरी काय? Air India च्या बोईंग विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; कोझिकोड एअरपोर्टवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.