
Krishna and Yashoda painting by Raja Ravi Varma was sold for ₹167 crore
Raja Ravi Varma Painting : कलाकौशल्याने अनोखे अविष्कार घडवणारे राजा रवि वर्मा यांनी तैलचित्र रेखाटली आहेत. भारतीय कलांमध्ये त्यांचे बहुमुल्य योगदान आहेत. राजा रवि वर्मा यांनी चित्रकलेच्या दुनियेमध्ये ध्रुवपद मिळवले असून त्यांची चित्रे आजही प्रत्येकाला सन्मोहित करत असतात. आजही सर्वत्र सोशल मीडिया राजा रवि वर्मा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी यशोदा आणि बाळकृष्ण यांच्या मातृत्वाच्या चित्राचे सर्वजण कौतुक करत असून आश्चर्य व्यक्त करत आहेत. तब्बल १६७ कोटींना विकल्या गेलेल्या या चित्रामध्ये अनोखे रहस्य दडले आहे.
सनातनी परंपरेमध्ये गाई-वासराला मातृत्वाचे स्थान देण्यात आले आहे. याचाच अविष्कार राजा रवि वर्मा यांनी आपल्या चित्रामध्ये जीवंत उतरवला आहे. माता यशोदा आणि लोभसवाणे बाळकृष्ण यांचे हे चित्रण संस्कृती, प्रेम आणि वात्सल्य याचे प्रतिक आहे. यामधून आई आणि मुलाचे प्रेम ओसंडून वाहत आहे. या चित्रात नटखट बाळकृष्ण हे माता यशोदेच्या मागे उभे आहे. बाळकृष्णावरच्या शरीरावरील दाग-दागिने हे त्यांची सुबत्ता आणि ऐश्वर्य दाखवून देत आहे. तर कृष्णाच्या एका हातामध्ये रिकामा ग्लास देखील दिसून येत आहे. बाळकृष्णाच्या चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत मोहित करणारे आहेत.
हे देखील वाचा : Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”
त्याचबरोबर गाईचे दुध काढण्यासाठी माता यशोदा बसल्या आहेत. त्या गाईची धार काढत असून दोन हंडे भरुन त्या दूध काढत आहेत. यामधून त्यांची समृद्धी दिसून येत आहे. माता यशोदाने नेसलेली जरदारीची साडी आणि भरजरीचा पदर लक्षवेधी ठरत आहे. त्याचबरोबर कर्नालंकार आणि इतर दागिने हे ठसठशीत उठून दिसत आहे. धारा काढताना माता यशोदांच्या चेहऱ्या स्मितहास्य आणि समाधान दिसून येत आहे. तर मागे उभे असलेल्या बाळकृष्णाची व्याकुळता देखील चित्रात अतिशय सुबकतेने रेखाटण्यात आली आहे.
राजा रवि वर्मा पेंटिंग कृष्ण यशोदा पेंटिंग 1६७ कोटींना विकली गेली
चित्रकलेचा उत्तम नमुना असलेले राजा रवी वर्मा यांचे ‘यशोदा नंदन कृष्ण’ हे चित्र १६७ कोटी रुपयांना (अंदाजे १.६ अब्ज डॉलर्स) विकले गेले. त्यामुळे सर्वत्र सोशल मीडियावर याच चित्राची आणि भारतीय कलेची चर्चा सुरु आहे. या मोठ्या डीलमुळे १ एप्रिल, २०२६ हा दिवस भारतीय कलाविश्वातील एक ऐतिहासिक क्षण ठरला. हा केवळ एक महागडा आणि आश्चर्यकारक लिलाव नव्हता, तर भारतीय सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक कला बाजार यांच्या संगमाचे एक प्रभावी उदाहरणही होते. एका साध्या, भावनिक आणि सहजसुंदर दृश्याला कॅनव्हासवर उतरवणे म्हणजे जणू एक संपूर्ण युगच त्याच्या मूळ रूपात टिपण्यासारखे आहे.
हे देखील वाचा : आसामच्या निवडणुकीमध्ये AIMIM ची एन्ट्री; असदुद्दीन ओवैसीनी साधला काँग्रेस अन् भाजपवर निशाणा
राजा रवी वर्मा यांनी 1890 च्या सालामध्ये तयार केलेल्या या चित्राचा भगवदगीतेशी देखील संबंध आहे. श्रीमद्भागवत कथेच्या दहाव्या स्कंधात भगवान कृष्णाच्या बालपणीच्या लीलांचे वर्णन आहे. त्यात त्यांच्या बालसुलभ खोड्या आणि खेळकर चाळे, तसेच त्यांची आई यशोदा यांच्यासोबतचे त्यांचे नाते चित्रित केले आहे. याच्याच आधारे राजा रवि वर्मा यांनी चित्र रेखाटले आहे. त्यांच्या चित्रकलेने साहित्याला समृद्ध केले आहे. यामुळे हे चित्र आजही आपली ओळख आणि श्रेष्ठता टिकवून आहे. आजही रसिकांना ते भूरळ घालते आहे.