AAP ची राज्यसभेतील उपनेतेपदावरून हकालपट्टी केल्यामुळे राघव चड्ढांनी सोशल मीडिया पोस्ट करुन उत्तर दिले (फोटो - सोशल मीडिया)
आम आदमी पार्टीने आता राघव चड्ढा यांच्या जागी नवीन उपनेत्याची नियुक्ती केली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार अशोक मित्तल आता राज्यसभेत उपनेते असतील. असं आप’ने सचिवालयाला कळवले आहे. यावरुन आप पक्षावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, यावर खासदार राघव चड्ढांनी यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यामधून त्यांच्यामधील आणि पक्षातील मतभेद देखील समोर आले आहेत.
हे देखील वाचा : Raghav Chadha यांची जागा घेणारे कोण आहेत अशोक कुमार मित्तल? कोट्यवधींची संपत्ती अन् शैक्षणिक पार्श्वभूमी
खासदार राघव चड्ढांनी आपल्या व्हिडिओतून नाराजी व्यक्त केली आहे. ते पक्षाला जनतेचच्या हिताचे प्रश्न मांडण्याची इतकी चिंता का वाटत आहे की ते त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. काव्यात्मक शैलीत आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवत ते म्हणाले, “माझ्या मौनाला पराभव समजू नका. मी एक नदी आहे, जी वेळ आल्यावर पुराचे रूप धारण करते.” असा धमकीवजा इशारा देखील राघव चड्ढांनी आम आदमी पक्षाला दिला आहे.
Silenced, not defeated My message to the ‘aam aadmi’
—
खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ ‘आम आदमी’ को मेरे संदेश pic.twitter.com/poUwxsu0S3 — Raghav Chadha (@raghav_chadha) April 3, 2026
खासदार राघव चड्ढा म्हणाले की, “मी जनतेसाठी आवाज उठवतो. आणि असे प्रश्न मांडतो जे सहसा संसदेमध्ये मांडले जात नाहीत. जनतेसाठी प्रश्न विचारणे किंवा सार्वजनिक मुद्द्यांवर बोलणे हा काही अपराध आहे का? की मी काही गुन्हा केला आहे का? मी काही चुकीचे केले आहे का? मी हा प्रश्न आज उपस्थित करत आहे कारण आप पक्षाने राज्यसभा सचिवांना हे सांगितले की राघव चढ्डांना संसदेमध्ये बोलण्यापासून रोखले जावे. हे खरं आहे की आप पक्षाने हे मला संसदेमध्ये बोलण्याची संधी देऊ नये असे सूचित केले आहे. माझे बोलणे कोणी का थांबवत आहे?” असे प्रश्न राघव चढ्डांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांसमोर उपस्थित केले आहेत.
हे देखील वाचा : आसामच्या निवडणुकीमध्ये AIMIM ची एन्ट्री; असदुद्दीन ओवैसीनी साधला काँग्रेस अन् भाजपवर निशाणा
पुढे ते म्हणाले की, “मी जेव्हा पण बोलतो तेव्हा तर मी देशातील नागरिकांसाठी बोलतो. एअरपोर्टवर मिळणाऱ्या महाग खाण्याच्या गोष्टींचा मुद्दा मांडला. डिलिव्हरी बॉयच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला, खाण्यातील भेसळीचा मुद्दा उपस्थित केला. टोलवसुली ते बँकेच्या लुटीचा मुद्दा मांडला. सामान्य लोकांना बसणारा टॅक्सचा फटका ते कंटेट क्रिएअरवरील बंदी, टेलिकॉम कंपनी 12 महिन्यात 13 वेळा रिचार्ज करुन घेते असे अनेक मुद्दे मी उपस्थित केले. मी हे मुद्दे संसदेमध्ये उपस्थित केल्यामुळे देशातील सामान्य लोकांचा तर फायदा झाला. पण यामुळे आम आदमी पक्षाचे काय नुकसान झाले? मला बोलण्यापासून रोखण्यासाठी काय कारण असेल? माझा आवाज का बंद केला जातोय?” असे राघव चड्ढा स्पष्टपणे म्हणाले असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
राघव चड्ढांनी जनतेला आवाहन करत म्हणाले की, “तुम्ही मला नेहमीच प्रेम आणि पाठिंबा देत आले आहात. मी जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी आवाज संसदेमध्ये उठवतो तेव्हा तेव्हा तुम्ही माझे कौतुक करता आणि मला शाबासकी देता. माझे मनोबल वाढवता. मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानू इच्छितो. माझी अशीच नेहमी साथ द्या आणि माझा हात कधी सोडू नका. मी तुमच्यातील एक आहे आणि तुमच्यासाठी आहे. आणि ज्या लोकांनी माझा संसदेतील आवाज दाबला आणि मला शांत केले त्यांना सुद्धा एक सांगतो की माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका…मी तो प्रवाह जो योग्य वेळी एक स्तुनामी बनतो..,” अशा शब्दांत खासदार राघव चड्ढांनी आम आदमी पक्षाच्या नेतृत्वावर निशाणा साधला.






