Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kulgam Terror Attack : कुलगाम पुन्हा हादरलं, दिवाळीच्या तोंडावर दहशतवाद्यांचा जवानांवर गोळीबार; तिघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Kulgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सीआरपीएफच्या नाक्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार. तीन जवान जखमी, एकाची प्रकृती गंभीर. मेहराज मलिक यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 11, 2026 | 05:08 PM
Kulgam Terror Attack : कुलगाम पुन्हा हादरलं, दिवाळीच्या तोंडावर दहशतवाद्यांचा जवानांवर गोळीबार; तिघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Kulgam Terror Attack : कुलगाम पुन्हा हादरलं, दिवाळीच्या तोंडावर दहशतवाद्यांचा जवानांवर गोळीबार; तिघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Follow Us
Follow Us:
  • पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला
  • दहशतवादी घटनास्थळावरून फरार
  • जखमींवर अनंतनाग येथील रुग्णालयात उपचार 
 

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम (Kulgam Terror Attack) जिल्ह्यात बुधवारी दुपारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) नाक्यावर हल्ला केला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सुरक्षा जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले असून, त्यापैकी एका जवानाची प्रकृती गंभीर आहे.

जखमी जवानांना उपचारासाठी अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर दहशतवादी फरार

सीआरपीएफच्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे २ वाजून १५ मिनिटांनी कुलगाम जिल्ह्यातील एका नाक्यावर तैनात असलेल्या जवानांवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. हा हल्ला अचानक झाल्याने जवानांना सावरण्याची संधी मिळाली नाही. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांच्या शोधासाठी व्यापक शोधमोहीम सुरू केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची नावे कॉन्स्टेबल राकेश दास, कॉन्स्टेबल संतोष चंद्रू आणि हेड कॉन्स्टेबल सोमवीर सिंह अशी आहेत.

राकेश दास हे आसामचे रहिवासी असून त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. संतोष चंद्रू हे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. त्यांच्या पोटात आणि मणक्याजवळ गोळ्या लागल्या आहेत. त्यांना तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Weather Update: ‘तो’ पुन्हा येणार! बंगालच्या खाडीत पुन्हा वादळाचे संकट, 13 नोव्हेंबरला बदलणार हवामान

सोमवीर सिंह यांची प्रकृती गंभीर

तिसरे जवान सोमवीर सिंह हे मध्य प्रदेशचे रहिवासी असून त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागली आहे. त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

दरम्यान, सुरुवातीला या हल्ल्यात दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यानंतर अधिकृत सूत्रांनी तीन जवान जखमी झाल्याची पुष्टी केली.

Sonia Gandhi : जन्मानंतर काही तासांतच पहिल्या बाळाचा मृत्यू; सोनिया गांधींनी पुस्तकातून सांगितला हृदयद्रावक प्रसंग

मेहराज मलिक यांची सुरक्षा यंत्रणेवर टीका

या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि डोडा मतदारसंघाचे आमदार मेहराज मलिक यांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना कुलगाममधील दिवसाढवळ्या झालेला दहशतवादी हल्ला हा जमिनीवरील सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचा स्पष्ट संकेत असल्याचे म्हटले.

तसेच जखमी जवान लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे. हल्लेखोर कोण होते, ते कोणत्या दिशेने पसार झाले आणि हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला कधी झाला?

    Ans: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बुधवारी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 2.15 वाजता हा हल्ला झाला.

  • Que: कुलगाम हल्ल्यात किती जवान जखमी झाले?

    Ans: या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले आहेत.

  • Que: हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काय कारवाई केली?

    Ans: हल्ल्यानंतर परिसराची नाकेबंदी करून पोलीस आणि सुरक्षा दलांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.

Web Title: Kulgam terror attack three crpf jawans injured mehraj malik rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • army
  • jammu kashmir
  • terror attack

संबंधित बातम्या

Army Cadet College प्रवेश परीक्षेचे अर्ज सुरू! जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क आणि परीक्षा पद्धती
1

Army Cadet College प्रवेश परीक्षेचे अर्ज सुरू! जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क आणि परीक्षा पद्धती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.