
ladakh hanle red aurora solar storm warning aditya l1 impact 2026
Solar storm impact on India January 2026 : सहसा नॉर्वे, आइसलँड किंवा अलास्कासारख्या ध्रुवीय प्रदेशात दिसणारे रंगीबेरंगी ‘ऑरोरा’ (Red aurora) जेव्हा भारतासारख्या देशात दिसतात, तेव्हा ते केवळ कुतूहलाचा विषय ठरत नाहीत, तर चिंतेची बाब बनतात. १९ आणि २० जानेवारीच्या रात्री लडाखमधील ‘हानले डार्क स्काय रिझर्व्ह’ (Hanle Dark Sky Reserve) चे निळे आकाश अचानक रक्तासारखे लाल झाले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असले तरी, शास्त्रज्ञांच्या मते हे दृश्य भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे.
सामान्यतः ध्रुवावर दिसणारे ऑरोरा हे ‘हिरवे’ असतात. मग लडाखमध्ये हा प्रकाश लाल का दिसला? शास्त्रज्ञांच्या मते, सौर कणांची जेव्हा वातावरणातील ऑक्सिजनशी टक्कर होते, तेव्हा प्रकाश निर्माण होतो. ३०० किमी पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या ऑक्सिजन अणूंशी सौर कणांचा संपर्क आल्यावर ‘लाल’ रंग उत्सर्जित होतो. लडाख हे कमी उंचीच्या अक्षांशावर असल्याने, आपल्याला या प्रकाशाचा केवळ वरचा ‘लाल’ भाग दिसला. हे दर्शवते की सौर वादळाची तीव्रता किती प्रचंड होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Security Alert: ‘पाकिस्तानात जाऊ नका!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना दिले कठोर आदेश; यामागील कारण धक्कादायक
या सर्व खगोलीय घटनेचे मूळ सूर्यामध्ये दडलेले आहे. १८ जानेवारी २०२६ रोजी सूर्याच्या पृष्ठभागावर ‘X-class’ या श्रेणीतील प्रचंड सौर ज्वाला (Solar Flare) उसळली. या स्फोटातून कोट्यवधी टन चुंबकीय ऊर्जा आणि वायू (Coronal Mass Injection – CME) अवकाशात १७०० किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने फेकले गेले. अवघ्या २५ तासांत हे वादळ पृथ्वीवर आदळले आणि त्यामुळे निर्माण झालेल्या G4-class भूचुंबकीय वादळामुळे लडाखमध्ये रक्ताळलेले आकाश पाहायला मिळाले.
Aurora lights witnessed in India 🇮🇳 Aurora lights were seen in Hanle, Ladakh, providing insight on incredible geomagnetic storm Stable Auroral Red Arcs (SAR arcs) captured from Hanle Dark Sky Reserve, UT Ladakh, on 11.05.24 at 0100 hrs. It is a very rare phenomenon.#IADN pic.twitter.com/ZfYvw22OaV — News IADN (@NewsIADN) May 11, 2024
credit – social media and Twitter
हे सौर वादळ केवळ आकाशात रंग भरत नाही, तर ते आपल्या तंत्रज्ञानाचे शत्रू ठरू शकते: १. पॉवर ग्रिड फेल्युअर: हे वादळ वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये उच्च दाबाचा प्रवाह निर्माण करू शकते, ज्यामुळे शहरे आठवडे अंधारात बुडू शकतात. २. उपग्रह आणि GPS: सौर कणांमुळे उपग्रहांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे तुमचे मोबाईल नेटवर्क, Google Maps आणि बँकिंग व्यवहार विस्कळीत होऊ शकतात. ३. अंतराळवीरांना धोका: हे किरणोत्सर्ग (Radiation) अंतराळात असलेल्या लोकांसाठी घातक ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gold Street : ‘सिटी ऑफ गोल्ड’ मध्ये बनणार सोन्याचा रस्ता; जाणून घ्या कुठे आहे ‘ही’ सुवर्णनगरी? पहिलाच VIDEO झाला रिलीज
सुदैवाने, भारत या संकटासाठी सज्ज आहे. इस्रोचे (ISRO) ‘आदित्य-L1’ हे या सौर वादळावर नजर ठेवून होते. या मिशनने दिलेल्या माहितीमुळे शास्त्रज्ञांना अशा संकटांची आगाऊ सूचना मिळते. जेव्हा अशी वादळे पृथ्वीकडे येतात, तेव्हा आदित्य-L1 सुमारे २४ ते ४८ तास आधी इशारा देऊ शकते, ज्यामुळे महत्त्वाचे उपग्रह ‘सेफ मोड’ मध्ये ठेवता येतात आणि पॉवर ग्रिड सुरक्षित करता येतात.
Ans: सूर्यावर झालेल्या X-class स्फोटामुळे निर्माण झालेले शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीच्या वातावरणाशी धडकल्यामुळे लडाखमध्ये हा प्रकाश दिसला.
Ans: जेव्हा सौर कण ३०० किमी पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या ऑक्सिजन अणूंना धडकतात, तेव्हा लाल रंग निर्माण होतो. लडाखमधून आपल्याला फक्त हा वरचा भाग दिसला.
Ans: थेट जमिनीवर मानवी आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत नाही, मात्र हे वादळ तंत्रज्ञान, उपग्रह आणि वीज पुरवठा विस्कळीत करू शकते.