Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News: लालू प्रसाद यादवांचा मोठा निर्णय; तेज प्रताप यादव पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित

लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी आज सोशल मीडियावर एक मोठा खुलासा केला. तेज प्रताप यादव यांनी कबूल केले आहे की मी अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबत १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 25, 2025 | 04:10 PM
Breaking News: लालू प्रसाद यादवांचा मोठा निर्णय; तेज प्रताप यादव पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित
Follow Us
Close
Follow Us:

पाटणा : राष्ट्रीय जनता दल (RJD)चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मोठा निर्णय घेत आपल्या मोठ्या पुत्राला, तेज प्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले असून त्यांना कुटुंबातूनही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.लालू प्रसाद यादव यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की, “खाजगी आयुष्यातील नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठी चाललेल्या आपल्या सामूहिक संघर्षाला कमजोर करता येते. माझ्या मोठ्या मुलाच्या वर्तनामुळे, सार्वजनिक वागणुकीमुळे आणि गैरजबाबदार वागणुकीमुळे कुटुंबाचे मूल्य आणि परंपरा धुळीस मिळाल्या आहेत. त्यामुळे वरील परिस्थिती लक्षात घेता मी त्याला पक्षातून तसेच कुटुंबातूनही बाहेर काढले आहे.”

ते पुढे म्हणाले, “या निर्णयानंतर तेज प्रताप यादव यांची पक्षात किंवा कुटुंबात कोणतीही भूमिका राहिलेली नाही. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चांगल्या-वाईट निर्णयांची जबाबदारी त्यांची स्वत:ची राहील. जे लोक त्यांच्याशी संबंध ठेवतील, त्यांनी स्वत:चा निर्णय स्वत: घ्यावा. मी सार्वजनिक जीवनात लोक-लाज आणि चारित्र्याचं नेहमीच समर्थन केलं आहे. माझ्या कुटुंबातील अनुशासित सदस्यांनीही या विचारसरणीचा स्वीकार केला आणि त्यानुसारच सार्वजनिक जीवन जगले.” या नाट्यमय घडामोडींमुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली असून यापुढील राजकीय समीकरणांवर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय आहे कारण?

घटस्फोटानंतर तेज प्रताप यादव यांनी शनिवारी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिकपणे खुलासा करताना सांगितले की, ते गेल्या १२ वर्षांपासून अनुष्का यादव नावाच्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. तेज प्रतापने सोशल मीडियावर दोघांचाही फोटो शेअर केला आणि त्यासोबत एक पोस्टही लिहिली. तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले की, “मी तेज प्रताप यादव आहे आणि या चित्रात माझ्यासोबत दिसणारी मुलगी अनुष्का यादव आहे! आम्ही दोघेही गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही गेल्या १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. मी बऱ्याच दिवसांपासून हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छित होतो, पण ते कसे सांगावे हे मला समजत नव्हते. म्हणूनच आज या पोस्टद्वारे मी माझ्या मनातील भावना तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. मला आशा आहे की मी काय म्हणत आहे ते तुम्ही सर्वांना समजेल.” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टनंतरच लालू प्रसाद यादव यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांचे लग्न २०१८ मध्ये तत्कालीन राजद आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय यांच्याशी झाले होते. तथापि, काही महिन्यांनंतर दोघांमध्ये कटुता निर्माण झाली आणि वादांमुळे ते वेगळे झाले. त्यांचा घटस्फोटाचा खटला सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.

त्याच वेळी, माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर, तेज प्रताप यांनी ट्विटरवर ट्विट केले की, माझा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक केला जात आहे आणि माझे फोटो चुकीचे एडिट करून मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना त्रास दिला जात आहे आणि बदनाम केले जात आहे. मी माझ्या हितचिंतकांना आणि अनुयायांना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन करतो.

Web Title: Lalu prasad yadavs big decision tej pratap yadav suspended from the party for six years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Bihar Politics
  • Lalu Prasad yadav
  • RJD

संबंधित बातम्या

Bihar Politics: नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा: भाजपच्या गोटात पडद्यामागील घडामोडींना वेग
1

Bihar Politics: नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा: भाजपच्या गोटात पडद्यामागील घडामोडींना वेग

Bihar Politics : लालू प्रसाद यादवांना मोठा धक्का; कन्या रोहिणी यांनी राजकारण सोडत कुटुंबाशी तोडले संबंध
2

Bihar Politics : लालू प्रसाद यादवांना मोठा धक्का; कन्या रोहिणी यांनी राजकारण सोडत कुटुंबाशी तोडले संबंध

Rohini Acharya: “मी माझ्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडत आहे…”, रोहिणी यांची एक्सवर पोस्ट, RJD च्या पराभवानंतर लालू कुटुंबात गोंधळ
3

Rohini Acharya: “मी माझ्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडत आहे…”, रोहिणी यांची एक्सवर पोस्ट, RJD च्या पराभवानंतर लालू कुटुंबात गोंधळ

Axis My India सर्वेक्षणात NDA सरकार स्थापनेचा अंदाज; RJD सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता
4

Axis My India सर्वेक्षणात NDA सरकार स्थापनेचा अंदाज; RJD सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.