
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Temple inauguration) सोहळा जवळ येऊन ठेपला आहे. या सोहळ्याची देशभरामध्ये तयारी सुरु झाली असून अयोध्या नगरी देखील सजली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळजवळ 8 हजार पाहुण्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पडद्यावर प्रभू श्री रामांचा (Parbhu Shree Ram) जीवनपट जीवंतपणे मांडणारे रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या ‘रामायण’ मालिकेतील (Ramayan serial) कलाकारांना देखील या मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्याची अयोध्येमध्ये येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
जुन्या काळातील लोकप्रिय मालिका आणि ज्या मालिकेतील लोकांच्या मनावर राज्य केले अशी रामानंद सागर यांची रामायण मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांनी आपल्या जीवंत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले. आजही प्रभू राम साकारणारे अरुण गोविल, सिता साकारणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) आणि लक्ष्मणाची व्यक्तीरेखा साकारणारे सुनील लहरी (Sunil Lahri) यांची पुजा करणारे अनेक लोक आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी हे तीनही कलाकार अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. या तीन कलाकारांचे अयोध्येमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्याभोवती नृत्य देखील सादर करण्यात आले.
So Beautiful..No actors can Match them and their Grace…
Jai Shri Ram ? ? ??#RamMandirPranPratishta #AyodhaRamMandir #RamMandir #Ayodhya #ArunGovil @arungovil12 ji pic.twitter.com/lGw4uCJ7GO — ???? ❤?? (@Abha_261) January 17, 2024
यावेळी रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तर अरुण गोविल आणि सुनील लहरी हे पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातला आहे. या तिघांभोवती लोकांनी बरीच गर्दी केलेली दिसून येत आहे. यावेळी काहींनी हातात झेंडेसुद्धा घेतले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
#ArunGovil, #DeepikaChikhlia, #SunilLahri, Ramayana legends, have arrived in #Ayodhya, elevating the essence of Jai Shree Ram and Jai Siya Ram. #AyodhyaArrival RamMandirPranPratishta #AyodhaRamMandir pic.twitter.com/UlqoPmBMZK — High On Persona Magazine (@highonpersona) January 17, 2024