नेपाळ करन्सी : नेपाळने 100 रुपयांच्या नवीन नोटा छापण्याची घोषणा शुक्रवारी केली. ज्यामध्ये लिपुलेख, लपियाधुरा आणि कालापानीसह नेपाळी नकाशा छापेल. भारताने आधीच या क्षेत्रांना कृत्रिमरित्या विस्तारित म्हटले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत निर्णय देताना नेपाळ सरकारच्या प्रवक्त्या, माहिती दळणवळण मंत्री रेखा शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, नेपाळचा नवा नकाशा 100 रुपयांच्या नोटेमध्ये छापण्याचा निर्णय नेपाळच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत झाला.
रेखा शर्मा म्हणाल्या की, दि. 25 एप्रिल आणि 2 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाने 100 रुपयांच्या नोटांचे डिझाईन आणि बॅंक नोटांच्या पार्श्वभूमीवर छापलेला जुना नकाशा बदलण्यास मंजुरी दिली आहे. नेपाळच्या या निर्णयावर अद्याप केंद्र सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी नेपाळने लिपुलेखन, कालापानी आणि लिपियापुधराला आपला प्रदेश म्हणून घोषित केले होते.
दि. 18 जून, 2020 रोजी नेपाळने आपल्या भूभागात तीन सामरिकदृष्ट्या लिपुलेख, लपियाधुरा आणि कालापानी या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश करण्यासाठी आपल्या संविधानात सुधारणा केली होती आणि भारताने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि याला नेपाळच्या प्रादेशिक दाव्यांचा कृत्रिम विस्तार म्हटले होते.