Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone युजर्ससाठी गुड न्यूज! ११ वर्षांनंतर Apple भारतात सुरू करणार ‘ही’ खास सर्व्हिस; काय असेल खास?

Apple भारतात आणखी एक नवीन सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. ही सेवा या वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही सेवा जगभरातील ८९ देशांमध्ये उपलब्ध आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 26, 2026 | 08:25 PM
iPhone युजर्ससाठी गुड न्यूज! (Photo Credit- X)

iPhone युजर्ससाठी गुड न्यूज! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • आयफोन युजर्सची ११ वर्षांची प्रतीक्षा संपली!
  • भारतात लवकरच लाँच होणार ‘ही’ सेवा
  • पाहा काय असणार खास
मुंबई: भारतातील आयफोन (iphone) वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या ११ वर्षांपासून ज्या सेवेची भारतीय युजर्स वाट पाहत होते, ती ‘Apple Pay’ सेवा आता अखेर भारतात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ॲपल कंपनीने यासाठी भारतात मोठी तयारी सुरू केली असून, विविध बँक आणि कार्ड नेटवर्कसोबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

११ वर्षांनंतर भारतीय बाजारपेठेत एन्ट्री

ॲपलने आपली ‘Apple Pay’ सेवा सर्वप्रथम सप्टेंबर २०१४ मध्ये अमेरिकेत लाँच केली होती. सध्या ही सेवा अमेरिका आणि ब्रिटनसह जगातील ८९ देशांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, भारतीय बाजारपेठेतील गुंतागुंतीचे नियम आणि पेमेंट स्ट्रक्चरमुळे ही सेवा भारतात उपलब्ध नव्हती. आता ११ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, भारतातील वाढती आयफोन युजर्सची संख्या पाहता ॲपलने ही सेवा लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रमुख बँकांशी चर्चा सुरू

‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, ॲपलने या सेवेसाठी भारतातील आघाडीच्या बँकांशी हातमिळवणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये ICICI Bank, HDFC Bank आणि Axis Bank यांसारख्या बँकांचा समावेश आहे. ॲपल पे ही सेवा गुगल पे (Google Pay) आणि सॅमसंग पे (Samsung Pay) प्रमाणेच काम करेल, ज्यामुळे आयफोन युजर्सना डिजिटल पेमेंटचा एक सुरक्षित आणि नवा अनुभव मिळणार आहे.

आयफोनपासून मॅकबुपर्यंत… Apple प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याचा सुवर्णसंधी, अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट नाही इथे उपलब्ध आहे Deal

NFC तंत्रज्ञानाचा वापर आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट

ॲपल पेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरले जाणारे NFC (Near Field Communication) तंत्रज्ञान.

  • युजर्सना आपला आयफोन किंवा ॲपल वॉच फक्त POS (Point of Sale) मशिनच्या जवळ नेऊन पेमेंट करता येईल.
  • यासाठी कार्ड स्वॅप करण्याची किंवा फिजिकल कार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.
  • ही सेवा जगभरातील ११,००० पेक्षा जास्त बँका आणि स्थानिक पेमेंट नेटवर्कशी जोडलेली आहे.

UPI सेवेसाठी NPCI च्या परवानगीची प्रतीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात ॲपल पे केवळ कार्ड-आधारित कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी उपलब्ध असेल. मात्र, भारतात युपीआय (UPI) पेमेंटची लोकप्रियता पाहता, कंपनी भविष्यात यामध्ये युपीआय सेवा समाविष्ट करण्याची शक्यता आहे. यासाठी ॲपलला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येणाऱ्या NPCI (National Payments Corporation of India) कडून तांत्रिक मंजुरी घ्यावी लागणार आहे. जर ही मंजुरी मिळाली, तर आयफोन युजर्स थेट ॲपल पे वरूनच स्कॅन करून युपीआय पेमेंट करू शकतील.

कधी होणार लाँच?

उद्योगातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ॲपल आपली ही ‘ॲपल पे’ सेवा या वर्षाच्या अखेरीस भारतात अधिकृतपणे लाँच करू शकते. यामुळे भारतात डिजिटल क्रांतीला आणखी वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Apple Event 2026: रहस्याचा पडदा उठणार! ‘या’ दिवशी कंपनी करणार धमाका, स्वस्त iPhone 17e आणि मॅकबुकसह लाँच करणार हे गॅझेट्स

Web Title: Good news for iphone users apple will launch this special service in india after 11 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • apple
  • india
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?
1

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा
2

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
3

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
4

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.